Rahul Gandhi (Photo Credits: PTI)

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोशल मीडियावर तिरस्कार पसरविणाऱ्या ट्रोल आर्मी (Troll Army) विरोधात मोहीम हाती घेतली आहे. राहुल गांधी यांनी सोमवारी (8 फेब्रुवारी) ट्विट करत एक हेल्पलाईन नंबर, खास सोशल मीडिया पेज लॉन्च केले आहे. तसेच, नागरिकांना आणि खास करुन युवकांना काँग्रेसच्या आयटी सेल (Congress IT Cell) सोबत जोडले जाण्याचे अवाहन केले आहे. राहुल गांधी यांनी या टीमला 'खरेपणाची फौज' ( Army of Truth) म्हटले आहे.

काँग्रेसची ही 'आर्मी ऑफ ट्रूथ' (Troll Army VS Army of Truth) ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पैसे घेऊन ट्रोल करणाऱ्यांचा सामना करेल. राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ संदेश देत म्हटले की, 'ट्रोल आर्मी देशाच्या एकूण व्यवस्थेवरच हल्ला करत आहे.' शेकडो, करोडो लोकांच्या मनात राह, तिरस्कार आणि नकारात्मकता भरत आहे. त्याचा सामना करण्यासाठी आर्मि ऑफ ट्रूथ काम करेन. राहुल गांधी यांनी सांगितले की, आपल्याला उदार मूल्ये, शांती आणि सौर्हाद तसे संयमित विचारांनी सामना करायला हवा. देशाची मुल्ये आणि ऐतिहासीक वारसा जपण्यासाठी अशा योद्ध्यांची आवश्यकता आहे. (हेही वाचा, Nana Patole on PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठकीत भांडण, भाजपला थेट सोडचिठ्ठी; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितला किस्सा)

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, देशातील वास्तवासोबत लढण्यासाठी आणि शांतता-सौहार्दपूर्ण संवाद वाढविण्यासाठी अहिंसक योद्ध्यांची गरज आहे. जो देशाच्या मुल्ल्यांचा विचार करेल. राहुल गांधी यांनी #JoinCongressSocialMedia हॅशटॅगसोबत ही मोहिमी लॉन्च केली.

राहुल गांधी यांनी एक हेल्पलाईन क्रमांक आणि काँग्रेसच्या आयटी सेलसोबत जोडण्यासाठी एक विशेष मीडिया पेजही लॉन्च केले आहे. राहुल गांधी यांनी हे अभियान अशा वेळी छेडले आहे, जेव्हा शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहाणा, पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग आणि अनेक विदेशी व्यक्तिमत्वांनी केलेल्या ट्विटवरुन देशात घमासान सुरु आहे. देशातील अनेक भारतरत्नांनी आणि व्यक्तीमत्वांनी ट्विट करुन मोहीम उघडली आहे.