शशी थरूर यांच्या विरुद्ध तिरुवनंतपूरम कोर्टाने जारी  केले अटक वॉरंट; महिलांचा अपमान केल्याचा आरोप
Shashi Tharoor | (Photo Credits: Shashitharoor.in)

काँग्रेस नेते (Congress Leader)  आणि खासदार शशी थरूर (MP Shashi Tharoor) यांना भाषेवरील प्रभूत्वामुळे अनेकदा ओळखले जाते, मात्र आता त्यांच्या काही शब्दांमुळेच ते चांगलेच अडचणीत आल्याचे समजत आहे. आपल्या एका पुस्तकात हिंदू समाजातील महिलांचा अवमान केल्याप्रकरणी तिरुवनंतपूरम  कोर्टाने (Trivendrum Court) शनिवारी, (21 डिसेंबर) रात्री थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. शशी थरूर हे लोकसभेच्या तिरुवनंतपूरम  मतदारसंघातून निवडून आलेले खासदार आहेत. ( हे ही  वाचा- मराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर? ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ)

प्राप्त माहितीनुसार, शशी थरूर यांनी त्यांच्या एका पुस्तकातून हिंदू महिलांचा अवमान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर थरूर कोर्टात उपस्थित राहिले नाही अशी माहिती त्यांच्या वकिलाने दिली होती परिणामी कोर्टाला त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करावे लागले.

ANI ट्विट

दरम्यान, सध्या देशात नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून सुरु असणाऱ्या वादात व आंदोलनात देखील थरूर यांचा सक्रिय सहभाग आहे. तिरुवनंतपूरम येथील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या जोडीने काही दिवसांपूर्वी त्यांनी हम कागज नही दिखायेंगे, ले के रहेंगे आझादी अशा घोषणा देत आंदोलनात सहभाग घेतला होता. या भूमिकेवरून त्यांना अनेकांनी सोशल मीडियावर सुनावले होते.