मराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर? ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ
Congress Leader Shashi Tharoor and NCP Leader Jayant Patil | (Photo credit: archived, edited, representative image)

काँग्रेस नेते आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी यांनी एका कार्यक्रमात बोलताना मराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज तसेच शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबद्दल एक विधान केले आहे. या विधानामुळे शशी थरुर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनीही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. प्राप्त माहितीनुसार, शशी थरुर यांचा हा व्हिडिओ MBIFL 19 या फेस्टिव्हलमध्ये भाषण करतानाचा आहे.

MBIFL 19 या फेस्टिव्हलमध्ये शशी थरुर भाषण करत असताना प्रश्नोत्तरेही घेण्यात आली. या वेळी उपस्थितांतील एका विद्यार्थ्याने प्रश्न केला की, इंग्रज हे व्यापारी म्हणून भारतात आलेच नसते तर, काय घडलं असतं? या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न लावता शशी थरुर यांनी उत्तर दिले की, ' इंग्रज भारतात आलेच नसते तर देशावर मराठ्यांचं राज्य असतं.'

प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना शशी थरुर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचे इतिहासातील एक उदाहरणही सांगितले. थरुर म्हणाले की, दक्षिण भारतासा मिळालेला सांबार हा पदार्थ संभाजी महाराज यांची देणगी आहे. संभाजी महाराज जेव्हा तंजावूर येथे आले तेव्हा त्यांना सांभार खावसं वाटत होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी खास सांबार बनविण्यात आले. त्यावेळी या पदार्थात मसाले, चिंच यांचा वापर करण्यात आला होता. पुढे हाच पदार्थ दक्षिण भारतात प्रसिद्ध झाला. (हेही वाचा, अभिनेत्री जयाप्रदा जेव्हा शाळकरी मुलांसमोर 'Country' ची स्पेलिंग चुकतात..(Watch Video))

जयंत पाटील यांनी फेसबुकवर शेअर केलेला शशी थरुर यांचा व्हिडिओ

पुढे बोलताना थरुर म्हणाले की, शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील परिसरात दबदबा होता. पुढे पेशव्यांनीही हीच वाट चोखाळत अटकेपार झेंडे लावले. यावरुनच ध्यानात येते की, जर इंग्रज भारतात आले नसते तर, मराठ्यांनी भारतावर राज्य केले असते. शशी थरुर यांच्या या भाषणाचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे.