Indian Railways. Representational Image (Photo Credits: Youtube)

रेल्वेकडून आठवड्याला अतिरिक्त स्पेशल ट्रेन (01035/01036) मुंबई आणि मैसूर दरम्यान येत्या 11 फेब्रुवारी पासून धावणार आहे. गाडी क्रमांक 01035 ही दादर येथून 9.30 वाजता प्रत्येक गुरुवारी येत्या 11 फेब्रुवारी पासून धावणार आहे. तर दुसऱ्या दिवशी रात्री 9.40 वाजता मैसूर येथे पोहचणार असल्याचे मध्य रेल्वेच्या एका प्रवक्त्यांनी म्हटले आहे.(IRCTC कडून ऑनलाईन बस तिकिट सर्विस लॉन्च, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)

त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 0136 ही मैसून येथून सकाळी 6.15 वाजता प्रत्येक रविवारी येत्या 14 तारखेपासून धावणार आहे. त्यानंतर ही ट्रेन दुसऱ्या दिवशी दादरला पहाटे 5.30 वाजता पोहचणार आहे. ट्रेनला एकूण 17 कोचेस असून त्यात 1 एसी (1 टीअर), 3 एसी कोचेस (3 टीअर), आठ स्लिपर क्लास आणि पाच सेकंड क्लास अशी आसनांची सुविधा असणार आहे.(IRCTC Gift For Pilgrims: 'या' धार्मिक स्थळांना भेट देण झालं सोयीस्कर; IRCTC यात्रेकरूंसाठी चालवणार 4 स्पेशन ट्रेन)

Tweet:

स्पेशल ट्रेन कल्याण, कर्जत (फक्त 01035 साठी), पुणे, सातारा, कराड, सांगली, मिराज, कुडाची, घाटप्रभा, बेलागावी, लोंडा, अलनवर, धारवार, हुबळी, हावेरी, रानीबेन्नुर, हरिहर, देवांगरे, बिरुर, कडूर, आर्सीकेरे, हसन, होले नर्सीपूर आणि क्रिष्णाराजनगर येथे थांबणार आहे.

गाडी क्रमांक 01035 साठी प्रवाशांना आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन तिकिटांचे बुकिंग करता येणार आहे. परंतु प्रवासादरम्यान नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असणार आहे.