IRCTC कडून ऑनलाईन बस तिकिट सर्विस लॉन्च, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
IRCTC | (Photo Credits: Wikipedia)

आयआरसीटीसीवर (IRCTC) अद्याप सर्व प्रवासी रेल्वे आणि विमान तिकिट बुकिंग करतात. पण आता आयआरसीटीसीच्या माध्यमातून बस तिकिट सर्विस सुद्धा मिळणार असून नागरिकांच्या उत्तम सुविधेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच आता प्रवासी एकाच ठिकाणाहून रेल्वे, विमान आणि बसची ऑनलाईन पद्धतीने तिकिट बुकिंग करु शकतात. यासाठी दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही आहे.(Online Fraud: निनावी कॉल्सवर PF अकाऊंट्स सह वैयक्तिक माहिती देणं टाळा; होऊ शकते मोठी फसवणूक)

जर तुम्ही आयआरसीटीसीच्या माध्यमातून बसची तिकिट बुकिंग करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला त्याचे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. तेथे तुम्हाला रेल्वे, विमान आणि बस तिकिट बुकिंगचा ऑप्शन दिसून येईल. यासाठी तुम्ही www.bus.irctc.in बेवसाइटवर सुद्धा भेट देऊ शकता.  येथे तुम्हाला पसंदीची सीट निवडता येणार असून तिकिट बुकिंग होईल. ही सेवा देशातील  22 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशात उपलब्ध असणार आहे. यासाठी या सर्व राज्यांसाठी 50 हजारांहून राज्य परिवह आणि खासगी बस ऑपरेटर्ससह बातचीत करण्यात आली आहे.(LPG Gas Cylinder: विना अनुदानित घरगुती सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आता किती पैसे मोजावे लागणार)

>>बस तिकिट बुकिंग करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा-

-तिकिट बुक करण्यासाठी तुम्ही www.bus.irctc.co.in वर भेट द्यावी लागेल. तेथे तुम्हाला जेथे जायचे आहे ते ठिकाण निवडावे

लागणार आहे.

-आता तारीख निवडल्यानंतर कोणत्या मार्गावर कोणती बस उपलब्ध आहे ते पहावे लागणार आहे.

-आता बसचा ऑप्शन, प्रवासाचा कालावधी आणि वेळ दिसेल. त्याचसोबत तिकिटांचे शुल्क आणि किती सीट्स शिल्लक राहिल्या आहेत ते दाखवले जाईल.

- सीट निवडल्यानंतर आता प्रोसीड टू बुक ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर पेमेंट केल्यास तुमची बसची तिकिट बुक होईल.

बस तिकिट बुकिंग करणाऱ्या प्रवाश्याला  बसचा मार्ग, सुविधा आणि रिव्हू सुद्धा दिसणार आहे. आपली बस निवडल्यानंतर कोणती हवी ती त्याने प्रवास करता येणार आहे. ऐवढेच नव्हे तर बस प्रवासादरम्यान पिकअप आणि ड्रॉप पॉइंट्ससह वेळ ही निवडता येणार आहे. या व्यतिरिक्त बँक आणि ई-वॉलेटच्या माध्यमातून डिस्काउंट ही मिळणार आहे.