प्रजासत्ताक दिनाचा (Republic Day 2021) राष्ट्रीय कार्यक्रम आणि शेतकरी आंदोलन (Farmers Protest) या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीसांनी राष्ट्रीय राजधानीच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. दिल्लीत प्रवेश करता येऊ नये यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेट्स लाऊन रस्ते बंद केले आहेत. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेले शेतकरी आज दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे. दरम्यान, दिल्ली-हरियाणा तिकरी बॉर्डरवर (Tikri Border) शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडल्याचे वृत्त आहे. हे शेतकरी पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समितीचे असल्याचे समजते.
दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला दिल्ली पलिसांनी सुरुवातील परवानगी नाकारली होती. त्यासाठी सर्वोच्च न्यायालाने मध्यस्थी करावी यासाठी याचिकाही दाखल करण्यात आली होती. परंतू, हा विषय दिल्ली पोलिसांच्या अखत्यारीतील आहे. त्यावर दिल्ली पोलिसांनीच निर्णय घ्याव असे न्यायालयाने सांगितली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीला परवानगी दिली.
प्रजासत्ताक दिनानिमतित्तर राजपथावर होणारे लष्करी संचलन आणि इतर कार्यक्रम पाहता हे संचलन संपल्यानंतर ट्रॅक्टर रॅली काढावी अशी अट दिल्ली पोलिसांनी ठेवली. त्यानुसार राजपथावरील संचलन पार पडल्यावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे. मात्र, दिल्ली-हरियाणा तिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडल्याचे वृत्त आहे. हे शेतकरी पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समितीचे असल्याचे समजते. (हेही वाचा, Tractor Parade On Indian Republic Day 2021: Farmers Protest च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीच्या सर्व सीमा बंद, दिल्ली पोलिसांनी जारी केली नवी नियमावली)
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वजीराबाद रोड, ISBT रोड, GT रोड, पुश्ता रोड, विकास मार्ग, NH-24, रोड नंबर 57 आणि नोएडा लिंक रोड सुद्धा बंद आहे. त्यामळे नागरिकांना या रस्त्यांचा वापर करता येणार नाही. वापर केलाच तर पुढे मार्गक्रमण करता येणार नाही.
Farmers #RepublicDay tractor rally from Tikri border enters #Delhi pic.twitter.com/FwYmdhK030
— ANI (@ANI) January 26, 2021
दिल्ली पोलिसांनी ट्रॅफिक अलर्ट जारी करत म्हटले की, जीटीके रोड, आउटर रिंग रोड, बादली रोड, केएन काटजू मार्ग, मधुबन चौक, कंझावाला रोड, पल्ला रोड, नरेला आणि DSIDC नरेला रोड या ठिकाणीही रस्ते बंद आहेत. जर अत्यावश्यक सेवा अथवा कारण असेल तरच हे रस्ते वापरासाठी खुले आहेत.
दिल्लीच्या सिमेवर देशभरातील प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी गेले 2 महिने आंदोलन करत आहेत. आंदोलन आणि कृषी कायद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात 12 वेळा चर्चा झाली. परंतू, सर्वच्या सर्व चर्चेच्या फेऱ्या अयशस्वी झाल्या. त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) काढण्याचा निर्णय घेतला आहे.