Coronavirus in India | (Photo Credits: PTI)

देशभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus)  प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्णासाठी अद्याप ठोस लस उपलब्ध नाही. तरीही कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान आता देशातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण देशात आज दिवसभरात तब्बल 5 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांसदर्भातील रिकव्हरी रेट 62.78 टक्क्यांवर पोहचल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.(भारतात अद्याप कोरोना व्हायरसचा Community Transmission नाही- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती)

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून याबाबत अधिक माहिती देत असे सांगण्यात आले आहे की, आज कोविड19 चे 5,15,385 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. कोविडच्या 2,31,978 अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सुधारण्याचा वेग अधिक आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. त्याचसोबत कोविड वॉरियअर्स सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपले कर्तव्य बजावत आहेत. (कोरोना व्हायरस लस किंवा औषध सापडले नाही, तर भारतात फेब्रुवारी 2021 पर्यंत दररोज आढळतील 2.87 लाख रुग्ण - MIT च्या अभ्यासातून खुलासा)

देशात गेल्या 24 तासांत 27,114 नवे रुग्ण आढळले असून देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या 8,20,916 वर पोहोचली आहे. तसेच काल दिवसभरात 514 कोरोना रुग्ण दगावले असून देशात मृतांचा आकडा 22,123 वर पोहोचला आहे. भारतात (India) सद्य घडीला 2,83,407 रुग्ण उपचार घेत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच काल दिवसभरात 19,873 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.