Coronavirus: भारतात कोरना व्हायरस चाचणीसाठी गेल्या 24 तासात 1,43,661 तर आतापर्यंत एकूण 43,86,376 नमूने तपासले- आयसीएमआर
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

इंडियन मेडीकल काऊन्सील ऑफ मेडिकल रिसर्च (Indian Council of Medical Research) अर्थातच आयसीएमआर (ICMR) द्वारा प्राप्त माहितीनुसार देशभरात आता पर्यंत कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित शोधण्यासाठी 43,86,376 नमूने तपासण्यात आले. त्यातील गेल्या 24 तासात 1,43,661 नमुने तपासण्यात आल्याची माहितीही आयसीएमआरने दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त आकडेवारीनुसार भारतातील कोरोना व्हायर संक्रमितांची एकूण संख्या 2,26,770 इतकी झाली आहे. त्यातील 1,10,960 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 1,09,462 जणांना उपाचारानंतर प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. देशभरात आतापर्यंत 6,348 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाल आहे. गेल्या 24 तासात भारतात 9,851 कोरना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तर 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा,Coronavirus: भारतात गेल्या 24 तासांत 9851 नव्या COVID-19 रुग्णांसह देशात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 2,26,770 वर )

कोरोना व्हायरस रुग्णांच्या महाराष्ट्रातील संख्येबाबत बोलायचे तर राज्यात आतापर्यंत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 77793 इतकी झाली आहे. त्यातील 33681 रुग्णांना उपचारानंतर बरे वाटू लागल्याने आणि त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. राज्यात कोरोना संक्रमित एकूण मृतांची संख्या 2710 इतकी आहे. तर, प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या नागरिकांची संख्या 41393 इतकी आहे.