Coronavirus: भारतात गेल्या 24 तासांत 9851 नव्या COVID-19 रुग्णांसह देशात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 2,26,770 वर
Coronavirus (Photo Credit: Twitter)

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना बाधितांची संख्या आता जवळपास 9000 च्या घरात जाऊन पोहोचली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 9851 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 2 लाख 26 हजार 770 वर पोहोचली आहे. तसेच मागील 24 तासांत 273 रुग्ण दगावले असून मृतांची एकूण संख्या 6348 वर पोहोचली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry Of India) दिली आहे. सद्य घडीला देशात 1,10,960 रुग्णांवर उपचार सुरु असून 1,09,462 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्र राज्यात सद्य घडीला एकूण 77,793 रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 2710 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे. Unlock 1: आरोग्य मंत्रालयाने जारी केले Religious Places, Private Offices, Hotels आणि Restaurants साठीचे नियम; मॉलमध्ये 24 च्या खाली AC नाही, मंदिरांमध्ये प्रसाद नाही, रेस्टॉरंट्समध्ये 50 टक्केच बैठक व्यवस्था

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, सातारा, आदी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

वैद्यकीय कर्मचारी हे ‘कोरोना योद्धा’ आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचे रक्षण व संरक्षण केले जावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका, उदयपूर येथील डॉक्टर आरुषी जैन यांनी दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. त्यावर प्रतिसाद म्हणून सरकारने वकील जीएस मक्कड यांच्यामार्फत हे निवेदन केले आहे की, आयसीएमआर, एम्स, डब्ल्यूएचओ आणि इतर वैद्यकीय तज्ञांशी सल्लामसलत करून पुरेशा उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, वैद्यकीय कर्मचार्‍यांना यापूर्वीच त्यांचे स्व-संरक्षण करण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे आणि शेवटी स्वतःच्या सुरक्षेसाठी ते स्वतः जबाबदार आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.