TMC खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहा (Nusrat Jahan) हिने तिला मुलगा झाल्याची गोड बातमी दिली आहे. तर कोलकाता मधील Neotia रुग्णालयात नुसरत जहा हिला दाखल करण्यात आले होते. अभिनेत यश दासगुप्ता याने नुसरत हिला रुग्णालयात घेऊन आला होता. डिलिव्हरी पूर्वी नुसरत हिने आपला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. तर आता आई झाल्यानंतर नुसरत हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
नुसरत हिच्या प्रेग्नंसी बद्दल मोठा वाद झाला होता. काही दिवसांपासून नुसरत ही प्रेग्नंट असल्याचे समोर आले होते. मात्र याच काळात नुसरत हिने बेबी फ्लॉन्ट करताना दिसून आली होती. त्यामुळे नुसरत जहा प्रेग्नंट असल्याची बातमी पुष्टी झाली होती. तर निखील जैन हिच्यासोबत नुसरत हिचा विवाह 2019 मध्ये झाला होता. त्यानंतर आता 2021 मध्ये हे दोघे विभक्त झाले.(Arshi Khan Engagement: अफगाणिस्तानचा क्रिकेटरशी अर्शी खान करणार होती साखरपुडा, तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर मोडत आहे नाते)
View this post on Instagram
दरम्यान, नुसरत हिच्या प्रेग्नंसी बद्दल निखिल जैन यांनी असे म्हटले की, त्याला याबद्दल काहीच माहिती नाही. याच काळात अभिनेता यश दासगुप्ता सोबत नुसरत हिचे अफेअर सुरु असल्याची बाब समोर आली होती. परंतु या दोघांनी आपल्या रिलेशनशिप बद्दल कंन्फर्म केले नाही आहे.