Arshi Khan Engagement: अफगाणिस्तानचा क्रिकेटरशी अर्शी खान करणार होती साखरपुडा, तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर मोडत आहे नाते 
Arshi Khan ( Photo - Instagram)

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून तेथील नागरिक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. त्याचप्रमाणे, ज्या लोकांचे अफगाणिस्तानशी संबंध आहे ते देखील कोणत्या ना कोणत्या कारणाने चिंताग्रस्त आहेत. असाच काहीसा प्रकार टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस (Bigg Bos) फेम अर्शी खानच्या (Arshi Khan)बाबतीत झाला आहे. ती लवकरच अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूशी लग्न करणार होती. (Bigg Boss 15: सलमान खान च्या बिग बॉस शो मधील नवं घर कसं आहे? पहा Photo) पण तिथली परिस्थिती पाहून ती घाबरली आहे .अर्शी खान म्हणते की, 'तिच्या वडिलांनी निवडलेल्या एका अफगाण क्रिकेटपटूशी लग्न होणार होते आणि आता तिला भीती वाटते की तालिबानच्या अफगाणिस्तानवर ताबा मिळाल्यामुळे तिच्या कुटुंबाला ही एंगेजमेंट रद्द करावी लागेल'.

 

View this post on Instagram

 

A post shared by ARSHI KHAN AK (@arshikofficial)

 

अर्शी खान म्हणाली की, ती तिच्या भावी मंगेतरच्या संपर्कात आहे, तो माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. आम्ही आता मित्राप्रमाणे बोलत आहोत. पण आता मला खात्री आहे की माझे आईवडील माझ्यासाठी भारतीय जोडीदार शोधतील." अर्शी खान म्हणाली की, तिच्या कुटुंबाची मुळे अफगाणिस्तानात आहेत. "मी एक अफगाण पठाण आहे, आणि माझे कुटुंब युसूफझाई वंशीय गटातील आहे. माझे आजोबा अफगाणिस्तानातून स्थलांतरित झाले होते आणि भोपाळमध्ये जेलर होते. माझी मुळे अफगाणिस्तानात आहेत, पण मी माझ्या आई-आणि वडील आणि आजी-आजोबांप्रमाणे भारतीय नागरिक आहे.