तिरुपती बालाजी मंदिर (फोटो सौजन्य-फेसबुक)

लाखो भविकांचे श्रद्धास्थान आणि जगप्रसिद्ध मंदिर म्हणून ओळख असणारे बालाजी तिरुपती मंदिरात देवाचे मौल्यवान असे सोन्याचे तीन मुकुट चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मंदिरातील काम करणाऱ्यांवर संशय व्यक्त केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

चोरीला गेलेल्या मुकुटांचे वजन जवळजवळ 4 किलोग्रॅम असून बाराव्या शतकातील असल्याची माहिती मंदिर अधीक्षकांकडून देण्यात येत आहे. शनिवारी प्रसाद वाटप करत असाताना हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर चोरीला गेलेल्या मुकुटांची किंमत तब्बल 1.5 कोटी एवढी आहे. (हेही वाचा-26/11 दहशतवादी हल्ला: पाकिस्तानच्या दोन लष्करी अधिकाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी)

तर पोलिसात चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हिरेजडिच असे मौल्यवान मुकुटांची चोरी ही मंदिरातील कामगार किंवा कंत्रांटी कामगार यांच्याकडून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच पोलिसांकडून मंदिरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून फुटेज कसून पाहत असल्याचे सांगितले जात आहे.