Time 100 Most Influential People: टाइम मासिकाने प्रसिद्ध केली जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी; Alia Bhatt, Sakshi Malik, Satya Nadella यांचा समावेश
Time 100 Most Influential People (File Image)

Time 100 Most Influential People: टाइम मासिकाने (Time 100) 2024 सालातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी (Most Influential People In The World) जाहीर केली आहे. यामध्ये बॉलिवूड स्टार आलिया भट्ट, दुआ लीपा, वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बंगा, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, कुस्तीपटू साक्षी मलिक आणि भारतीय वंशाचा ब्रिटिश अभिनेता देव पटेल यांनी या यादीत स्थान मिळाले आहे. कुस्तीपटू साक्षी मलिक ही भारतातील एकमेव महिला ऑलिम्पिक पदक विजेती आहे, जिचा टाइम मासिकाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

या यादीत अमेरिकेच्या ऊर्जा कर्ज कार्यक्रम कार्यालयाचे संचालक जिगर शाह, येल विद्यापीठातील खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक प्रियमवदा नटराजन यांचाही समावेश आहे. याशिवाय भारतीय वंशाच्या रेस्टॉरंटच्या मालक अस्मा खान आणि दिवंगत रशियन विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांच्या पत्नी युलिया नवलनाया यांनाही स्थान देण्यात आले आहे.

भारतीय वंशाचे अजय बंगा यांनी गेल्या वर्षी 2 जून रोजी जागतिक बँकेचे अध्यक्षपद स्वीकारले. यासह जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) या दोन जागतिक वित्तीय संस्थांचे अध्यक्षपद भूषवणारे ते पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती ठरले. ओपन-एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सॅम ऑल्टमन यांची टाईम मॅगझिनने 'सीईओ ऑफ द इयर 2023' म्हणून निवड केली आहे. सॅम ऑल्टमन यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. सॅम व्यतिरिक्त टाइम मासिकाने टेलर स्विफ्टला 'पर्सन ऑफ द इयर' आणि लिओनेल मेस्सीला 'ॲथलीट ऑफ द इयर' म्हणून घोषित केले आहे. (हेही वाचा: First Indian Space Tourist: पायलट Gopi Thotakura ठरले पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय; Jeff Bezos यांच्या Blue Origin द्वारे करणार प्रवास)

दरम्यान, टाईम 100 ही अमेरिकन न्यूज मॅगझिन टाईमने एकत्रित केलेली जगातील शीर्ष 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी आहे. अमेरिकन शैक्षणिक, राजकारणी आणि पत्रकार यांच्यातील वादाचा परिणाम म्हणून 1999 मध्ये प्रथम प्रकाशित झालेली ही यादी आता जगभरात प्रसिद्ध आहे. प्रभावशाली व्यक्तींची अंतिम यादी केवळ टाइम संपादकांद्वारे निवडली जाते,