Delhi Chief Minister's Swearing-in Ceremony (फोटो सौजन्य - BJP)

Delhi Chief Minister's Swearing-in Ceremony: दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ (Delhi New CM Swearing-in Ceremony) 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीत होण्याची शक्यता आहे. हा विशेष कार्यक्रम रामलीला मैदानात (Ramlila Maidan) आयोजित केला जाईल. सोमवारी होणारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, बुधवारी, 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. तसेच गुरुवारी, 20 फेब्रुवारी रोजी दिल्ली मुख्यमंत्र्यांचा मोठा शपथविधी समारंभ होईल. हा शपथविधी सोहळा रामलीला मैदानावर होणार आहे.

रामलीला मैदान हे संभाव्य ठिकाणांपैकी एक आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 48 भाजप आमदारांपैकी 15 जणांची नावे निवडण्यात आली आहेत. यात नऊ जणांची मुख्यमंत्री, राज्य कॅबिनेट मंत्री आणि सभापती या महत्त्वाच्या पदांसाठी निवड केली जाणार असल्याचं इंडिया टूडेने वृत्त प्रकाशित केलं आहे. (हेही वाचा -Delhi New Chief Minister: दिल्ली विधानसभा निवडणुकीतील BJP च्या विजयानंतर सुरु झाली नवीन मुख्यमंत्र्याबद्दल चर्चा; जाणून घ्या कोण आहेत प्रबळ दावेदार)

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर झाले. दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपने 70 पैकी 48 विधानसभा जागा जिंकल्या. तर आम आदमी पक्षाने (आप) 22 जागा जिंकल्या. दिल्लीत तब्बल 27 वर्षांनी भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. या कारणास्तव, शपथविधी सोहळा देखील खूप भव्य असणार आहे. (हेही वाचा: Delhi Election Results 2025: दिल्ली निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदी पोहोचले भाजप मुख्यालयात; कार्यकर्त्यांचे मानले आभार)

मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप निश्चित नाही -

तथापी, दिल्लीत भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) वरिष्ठ नेते दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत अनेक बैठका घेत आहेत. या बैठकींनंतरच मुख्यमंत्र्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केला जाणार आहे.