
ठाणे (Thane) येथे स्कुटरवरुन जाणाऱ्या दोन महिलांचा झोमॅटो (Zomato) कंपनीच्या डिलिव्हरी बॉयकडून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन्ही डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे. तसेच या दोघांना न्यायालयीन कोठडीत मंगळवार पर्यंत ठेवण्यात यावे असे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पीडित महिला घोडबंदर येथील एका रुग्णालयात आईच्या उपचारासाठी आली होती. त्यानंतर तिने आईला रिक्षा मध्ये बसवून महिला मैत्रीणीसोबत तिच्या स्कुटरवरुन निघाली. मात्र काही अंतर या दोघी पुढे गेल्या असता पाठून बाइकवरुन आलेल्या दोन डिलिव्हरी बॉयनी या दोघींना पाहून शिवीगाळ करत विनयभंग केला. तसेच दोघींना मारहाण करण्यासाठी हात उगारला होता.(नवी मुंबई: Zomato च्या महिला कर्मचाऱ्याने पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप, पहा व्हिडिओ)
परंतु तेथे वाहतुक पोलिसांनी त्यांना अडवत याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांना घडलेल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर यापूर्वी सुद्धा नवी मुंबईत एका डिलिव्हरी महिलेने पोलिसांना तिची बाइक टोइंग केल्याप्रकरणी शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला होता.