नवी मुंबई: Zomato च्या महिला कर्मचाऱ्याने पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप, पहा व्हिडिओ
Zomato Delivery Women (Photo Credits-Mumbai Press/YouTube)

नवी मुंबई (Navi Mumbai)  येथे Zomato फुडची डिलिव्हरी करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने पोलिसांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तर महिलेने केलेल्या वर्तवणुकीबद्दल तिला सानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई प्रेस यांनी दिलेल्या वृत्तानुसार, वाशी सेक्टर 17 मध्ये हा प्रकार घडला आहे. झोमॅटोसाठी काम करणाऱ्या एका महिलेची बाइक नो पार्किंग मध्ये लावली असता वाहतूक पोलिसांनी ती टोईंग केली. त्यानंतर या महिलेने संतप्त होत पोलिसांना शिवागाळ केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी महिलेच्या या वागणुकीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. मात्र महिलेनेसुद्धा पोलिसांना तुम्ही कशा प्रकारे जबरदस्तीने नागरिकांकडून पैसे वसूल करतात असे म्हणत अशी दादागिरी करताना दिसली.(उपवसाच्या खाद्यपदार्थाऐवजी चिकनची मेजवानी, झोमॅटोला 55 हजार रुपयांचा दंड)

या प्रकरणी महिलेने पोलिसांना चोर असल्याचा आरोपसुद्धा लगावला आहे. तसेच गाडीच्या बाजूला आम्ही उभे राहतो तरीही हे पोलीस लोक आमच्याकडून पैसे वसूल करत असल्याची टीका ही या महिलेने केली आहे. यापूर्वी सुद्धा झोमॅटोवरुन काही वाद निर्माण झाल्याचा घटना समोर आल्या आहेत.