पुण्यातील (Pune) एका ग्राहकाने प्रसिद्ध अशा ऑनलाईन पद्धतीने फूड डिलिव्हरी करणारे अॅप झोमॅटो (Zomato) त्यावरुन खाद्यपदार्थ मागवले. मात्र उपवास असल्यामुळे त्यांनी व्हेज पदार्थ मागवला होता. परंतु झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने त्यांना नॉनव्हेज पदार्थ आणून दिल्याने ग्राहक संतप्त झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐवढेच नाही ग्राहकाने झोमॅटोविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
देशमुख हे पुण्यात काही कामानिमित्त आले होते. तर देखमुख यांनी त्यांचा उपवास असल्याकारणाने झोमॅटोवरुन पनीर बटर मसाला मागवले होते. मात्र जेवण वाढून घेत असताना पनीर बटर ऐवजी त्यांना बटर चिकन पार्सलमध्ये देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकारानंतर त्यांनी डिलिव्हरी बॉयला फोन लावत झापले. मात्र त्या मुलाने हॉटेलमधून डबाबंद जेवण दिले जाते ते आम्ही उघडून पाहू शकत नाही असे म्हटले. त्यानंतर देशमुख यांनी सरळ हॉटेल मालकाला फोन लावून सगळा घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा हॉटेल मालकाने मी दुसरे जेवण पाठवतो असे म्हटले.
मात्र देशमुख यांनी याप्रकरणी झोमॅटो आणि संबंधित हॉटेलला कायदेशीर नोटीस पाठवली. तर धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत त्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्यावेळी दोघांकडून आम्ही नुकसान भरपाई देणार नसल्याचे सांगितले. तर ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेत याबद्दल सांगितले. त्यानुसार ग्राहक मंचाने झोमॅटोला आणि संबंधित हॉटेलला 55 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.