जम्मू काश्मिर येथे दहशतवाद्यांनी पुन्हा सीआरपीएफ जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील त्राल भागात नौदल येथील सीआरपीएफ कॅम्पवर (CRPF Camp) दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती एएनआय (ANI) कडून देण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या कॅम्पवर ग्रेनेड (Grenade) हल्ला केला असून एक जवान जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. श्रीनगर (Srinagar) आणि उधमपूर (Udhampur) येथील लोकसभा मतदार संघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला काश्मीरमध्ये हल्ला झाल्याने सुरक्षा कडक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेले CRPF जवान म्हणजे नेमके कोण? सुरक्षा व्यवस्थेमध्ये काय असते त्यांची जबाबदारी?
ANI ट्विट
Jammu & Kashmir: Terrorists hurled a grenade at CRPF camp at Nowdal, Tral in Pulwama district, today. One CRPF personal injured; More details awaited
— ANI (@ANI) April 17, 2019
14 फेब्रुवारी 2019 दिवशी सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर जैश ए मोहम्मद संघटनेने हल्ला केला होता. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांवर केलेला तो सर्वात मोठा हल्ला होता. त्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून जैश ए मोहम्मदच्या कॅम्पला उडवण्यासाठी एअर स्ट्राईक केला होता. त्यानंतर भारत पाक संबंध तणावग्रस्त झाले आहेत.