अयोध्या येथे दहशतवादी हल्ल्याची शक्यता- मीडिया रिपोट्स
Terrorists | Image Used for Representational Purpose | (Photo Credits: ANI) |

रामजन्मभूमी अयोध्या येथे दहशतवादी हल्ल्याची शक्यता मीडियारिपोर्ट्स मधून व्यक्त करण्यात आली आहे. तर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सुत्रधार मसूद अजहर हा हल्ला करण्याच्या तयारी असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अयोध्येत सुरक्षा यंत्रणा अधिक वाढवण्यात आली आहे. मसूद अजहर याचा एक संदेश गुप्तचर यंत्रणांनी इंटरसेप्ट केला आहे. त्यानुसार मसूद हा अयोध्या येथे हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच नागरिकांना आणि पोलीस दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सर्व सुरक्षा यंत्रणांना मसूद अजहर याचा संदेश गुप्तचर यंत्रणेकडून पाठवण्यात आला आहे. त्यानुसार अयोध्यासह अन्य महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसेच देशभरात या दहशतवादी संबंधित नेटवर्कवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तर देशभरात अद्याप ही नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आली. तर देशातील विविध राज्यातील 18 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभुमीवर देशातील वातावरण अधिक खराब करण्याच्या दृष्टीकोनातून मसूज अजहर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Citizenship Amendment Act: 'नागरिकत्व सुधारणा कायदा देशातील कोणत्याही धर्माच्या, भागातल्या नागरिकावर विपरीत परिणाम करणार नाही')

 तसेच देशाच्या सीमारेषेवर ही सुरक्षा व्यवस्था अधिक वाढवली आहे. पाकिस्तान सातत्याने नेपाळच्या सीमेचा वापर करुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र अयोध्या नेमक्या कोणत्या ठिकाणी हल्ला करणार असल्याचे कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. तर 2005 मध्ये सुद्धा अयोध्येत आत्मघाती हल्ला करण्यात आला होता.