परीक्षा | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

नुकताच सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकच्या हिजाब वादावर निर्णय दिला. हे प्रकरण आता मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले. या हिजाब प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत देशात बरेच राजकारण झाले. आता तेलंगणामध्ये (Telangana) एक प्रकरण समोर आले आहे, जिथे परीक्षेदरम्यान हिंदू महिलांसोबत भेदभाव केला गेल्याचे दिसून येत आहे. इथे परीक्षेदरम्यान हिंदू महिलांना मंगळसूत्र, पैंजण, बांगड्या आणि कानातले काढण्यास भाग पाडले गेले, मात्र दुसरीकडे मुस्लीम महिलांना कोणत्याही निर्बंधाशिवाय बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला.

नुकतेच तेलंगणाच्या आदिलाबाद येथे, तेलंगणा राज्य लोकसेवा परीक्षा (TPSSC) द्वारे विद्यार्थी कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालयात गट-1 ची प्राथमिक परीक्षा घेण्यात आली. यावेळी केंद्रावर घडलेल्या या घटनेबाबत मोठा गदारोळ माजला आहे. इथे परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी महिलांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये हिंदू महिलांना मंगळसूत्र, बांगड्या आणि पैंजण काढायला लावले. परंतु मुस्लिम महिलांना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला.

घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करत भाजप नेत्या प्रीती गांधी यांनी प्रश्न केला आहे की, परीक्षा केंद्रावर बुरख्याला परवानगी आहे, परंतु मंगळसूत्र व बांगड्यांना नाही. हा भेदभावाच्या राजकारणाचा कळस आहे. यानंतर राज्यातील इतर भाजप नेत्यांनीदेखील तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) सरकारवर जोरदार हल्ला चढवला. टीआरएस अल्पसंख्याक तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे, असा त्यांचा आरोप आहे. (हेही वाचा: दिल्लीमध्ये पुन्हा निर्भयाकांड, 5 जणांनी केला सामूहिक बलात्कार; लैंगिक अत्याचारांनंतर आरोपींनी पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला रॉड)

ही घटना 16 ऑक्टोबर 2022 ची आहे. या घटनेच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बुरखा घातलेली एक महिला परीक्षा केंद्रात प्रवेश करत आहे, तर इतर स्त्रिया त्यांच्या अंगावरचे दागिने काढत आहेत. याबाबत आदिलाबादचे पोलीस अधीक्षक (एसपी), डी उदय कुमार रेड्डी यांनी कबूल केले की काही 'चुकी'मुळे हिंदू महिलांना त्यांचे दागिने काढण्यास सांगितले गेले.

ते म्हणाले, सुरुवातीला एमआरओ (विभागीय महसूल अधिकारी) च्या चुकीमुळे हे घडले. त्यामुळे हिंदू महिलांना त्यांचे सर्व दागिने काढण्यास सांगण्यात आले, मात्र नंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि हिंदू महिलांना मंगळसूत्र घालण्यास परवानगी देण्यात आली.