Telangana: 6 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीचा मृत्यू; रेल्वे रुळावर आढळला मृतदेह
Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

तेलंगणा (Telangana) मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 6 वर्षीय मुलीच्या बलात्कार (Rape) आणि हत्ये (Murder) प्रकरणी बेपत्ता असलेल्या आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळावर (Rail Track) सापडला आहे. जनगाव तालुक्यातील रेल्वे रुळावर गुरुवारी हा मृतदेह आढळल्याची माहिती तेलंगणाचे डिरेक्टर जनरल ऑफ पोलिस एम, महेंदर रेड्डी (M Mahendar Reddy) यांनी ट्विटद्वारे दिली. सिंघारेनी कॉलनी (Singareni Colony) मधील झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी होता. (Palghar: 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या 11 वर्षीय मुलाला बोईसर येथून अटक)

आरोपीचा मृतदेह घनपूर रेल्वे पोलिस हद्दीत सापडला असून या आरोपीच्या शरीरावरील खुणांवरून याची ओळख पटली, अशी माहिती रेड्डी यांनी दिली. घनपूर रेल्वे स्टेशनवरील ट्रॅकवर स्थानिकांना सकाळी पावणे दहाच्या दरम्यान एक मृतदेह आढळला. या मृतदेहाचे डोके गंभीररीत्या जखमी झाले होते, अशी माहिती जनगावच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. (तेलंगणा: 90 वर्षांच्या वृद्धेवर नराधमाने बलात्कार करून केला खून)

पी. राजू असे या आरोपीचे नाव असून तो 30 वर्षांचा होता. आरोपीने चालू ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पीडित मुलीवर 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सायदाबाद येथील घरात बलात्कार झाला होता. त्यानंतर आरोपीने त्या मुलीची हत्या केली. या घटनेनंतर स्थानिकांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी निदर्शने देखील केली होती. दरम्यान, हा अपघात होता की आत्महत्या हे पोलिस तपासात सिद्ध होईल.