तेलंगणा: 90 वर्षांच्या वृद्धेवर नराधमाने बलात्कार करून केला खून
देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच आता तेलंगणामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 90 वर्षांच्या वृद्धेवर एका नराधमाने बलात्कार करून आपण पकडले जाऊ या भीतीने तिची हत्याही केली आहे. तेलंगणामधील नळगोंडा या जिल्ह्यातील अनुमुला या गावात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे अनुमुला गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच आता तेलंगणामध्ये (Telangana) माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 90 वर्षांच्या वृद्धेवर एका नराधमाने बलात्कार (Rape) करून आपण पकडले जाऊ या भीतीने तिची हत्याही (Murder) केली आहे. तेलंगणामधील नळगोंडा या जिल्ह्यातील अनुमुला या गावात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे अनुमुला गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, 90 वर्षांची वृद्ध महिला आपल्या घरी एकट्या राहायच्या. त्यांच्या घरापासून त्यांच्या मुलाचं घर जवळचं होतं. रविवारी सकाळी या वृद्ध महिलेची सून त्यांना चहा देण्यासाठी त्यांच्या घरी गेली. तेव्हा सुनेला तेथे त्यांचा मृतदेह दिसला. त्यानंतर सुनेने आरडाओरडा सुरु केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (हेही वाचा - नवापूर: महाराष्ट्र-गुजरात सीमेवर बस-टँकर व क्रुझरला अपघात; 9 जणांचा मृत्यू तर 24 जखमी; 2 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
दरम्यान, पोलिसांना या 90 वर्षीय वृद्धेच्या अंगावर दात आणि नखांच्या जखमा दिसल्या. पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार या वृद्धेवर बलात्कार करण्यात आला असावा. पीडित वृद्धेच्या मुलाने पोलिसांत तक्रार दाखल करत घराजवळच्या सत्रसाला शंकर या 22 वर्षीय तरुणावर संशय व्यक्त केला आहे. शंकर हा वृद्ध महिलेच्या घराजवळ दारूच्या नशेत फिरताना आढळला होता, असं पीडितेच्या मुलाने सांगितलं आहे.
शंकरने यापूर्वीही गावातील अनेक स्त्रियांशी असभ्य वर्तन केलं आहे. तसेच शंकरने आतापर्यंत अनेक स्त्रियांची छेडछाडही केली आहे. वृद्धेची हत्या करून शंकर घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिस फरार शंकरचा शोध घेत आहेत. वृद्ध महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालात वृद्धेच्या हत्येचे कारण समजण्यास मदत होणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Mar 02, 2020 08:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

