पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडियाला रामराम करण्याच्या विचाराने ट्वीटरवर #NoSir हॅशटॅग ट्रेन्ड होत आहे. 

इटली येथे कोरोना व्हायरसमुळे 18-52 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण आणि परिवाराच्या विरोधात सुनेचा छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ अमृता फडणवीस यांची सुद्धा सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी युट्युब, फेसबुक, ट्वीटरवरुन बाहेर पडण्याचा विचार करत असून येत्या रविवार पर्यंत निर्णय घेण्याची शक्यता आहे.  

कोरोनामुळे इराणमध्ये अडकून पडलेल्या 34 कोल्हापूरकरांना मदत करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याकडे केली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर धावणारी एसी लोकल महिला कर्मचार्‍यांनी चालविली.

महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील असलेल्या सोनगड शहराजवळ बस-टॅकर आणि क्रुझरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. 

पुण्यातील लोणीकंद-केसनंद परिसरातील रस्त्याच्या कडेला कचऱ्यामध्ये अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह कचऱ्यात आणून टाकला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

निर्भया प्रकरण: दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टाने निर्भया प्रकरणातील चारही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणण्याचा आदेश दिला आहे.

Load More

आजपासून लोकसभेमध्ये अर्थसंकल्पी अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. या अधिवेशनात दिल्लीतील हिंसाचाराचा मुद्दा विरोधक उचलून धरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली जाणार आहे असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस दिल्लीतील जातीय हिंसाचाराच्या प्रकरणी तहकुबी सूचना दोन्ही सभागृहात आज मांडण्यात येईल. त्यात दिल्लीतील हिंसाचारावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करण्यात येईल. त्यामुळे एकूणच दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा संसदेत जोर धरणार आणि यावर काय अंतिम निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्याचबरोबर मुंबई-पुणे महामार्गावर रविवारीत्र रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक्सप्रेस वे कडे जाणा-या खंडाळा येथील अंडा पॉईंट जवळील धोकादायक वळणावर हा अपघात झाला.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

दिल्लीत जे घडतंय त्याची १०० टक्के जबाबदारी केंद्र सरकारवर पडते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे. रविवारी मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.