Kill | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

सोशल मीडियावर ( Social Media) वेळ घालवणे आणि इन्स्टाग्राम रिल्स (Instagram Reels) बनवणे यांसारख्या सवयीच्या अतिरेकास कंटाळलेल्या एका पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, 38 वर्षी आरोपी अमृतलिंगम (Amirthalingam) याला अटक करण्यात आली आहे. त्याची पत्नी चित्री हिला रिल्स बनविण्याचा छंद होता. तसेच ती सोशल मीडियावरही खूप वेळ घालवत असे. तिच्या या सवयीलाच आरोपी वैतागला होता. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

तामिळनाडू राज्यातील तिरुपूरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी या घटनेबद्दल सांगताना म्हटले की, चित्राच्या रील्स बनवणे आणि ते पोस्ट करणे इत्यादींमुळे पती पत्निमध्ये वाद होता. वारंवार सांगूनही पत्नी एकत नसल्याचे पाहून पती (अमृतलिंगम) भडकला. त्याने पत्नीची हत्या केली. अमृतलिंगम हा भाजी मंडईत हमाल काम करतो. तो आपल्या कुटुंबासह तिरुपूरच्या सेलमनगर येथे राहत होता. त्याची पत्नी चित्रा एका कपड्याच्या कारखान्यात काम करत होती आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय होती. या कुटुंबाचे हातावरचे पोट होते. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी पडेल ते काम करावे लागत असे. (हेही वाचा, Wife Beats Husband: वाचवा! बायको खूपच मारते हो, त्रस्त नवऱ्याकडून पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार)

चित्राने इन्स्टाग्राम आणि तत्सम सोशल मीडियावर अनेक रिल्स पोस्ट केल्या. त्यामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली. तिच्या रिल्सला येत असलेल्या लाईक्स आणि वाढता प्रतिसाद पाहून तिच्या मनात अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा उत्पन्न झाली. इन्स्टाग्रामवर 33 हजार फॉलोअर्स असलेल्या चित्राने कारखान्यातील नोकरी सोडली आणि अभिनयात संधी शोधण्यासाठी ती चेन्नईला दाखल झाली.

दरम्यान, सोशल मीडियावर रिल्स बनविणे, अभिनयात करीअर करण्याचा विचार करणे त्यासाठी कारखान्यातील काम सोडणे या गोष्टी चित्राच्या पतीला मान्य नव्हत्या. दरम्यान, नात्यातील एका लग्नासाठी चित्रा चेन्नईहून परत आली होती. दरम्यान, लग्न आटोपून परत जात असताना पतिने तिला विरोध केला. तीला आपल्यासोबत थांबण्याचा आग्रह केला. यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यातूनच अमृतलिंगम याने पत्नीचा गळा आवळा. ज्यात तिचा मृत्यू झाला. पत्नीच्या हत्येनंतर त्याने आपल्या मुलीला याबाबत माहिती दिली. मुलीने पोलिसांत तक्रार दिली. इंडिया टुनेने याबाबत वृत्त दिले आहे.