सध्या सोशल मीडियात प्रसिद्ध असणारे टिकटॉक अॅपमुळे (TikTok App) दिवसेंदिवस मानवी आयुष्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही दिवसांपासून टिकटॉकवरील व्हिडिओवरुन दुर्घटना घडल्या आहेत. तर नुकत्याच दोन दिवसांपूर्वी शिर्डी (Shirdi) येथील एका मुलगा व्हिडिओ बनवत असताना त्याच्या हातातील पिस्तुलातील गोळी सुटून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर आता तमिळनाडू (Tamil Nadu) येथे राहणाऱ्या एका महिलेने टिकटॉकच्या अतिवापरामुळे नवरा चिडल्याने तिने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली आहे.
अनिता असे या महिलेचे नाव आहे. तर अनिता हिला नवऱ्याने ती सातत्याने टिकटॉकचा वापर करुन व्हिडिओ बनवत असल्याने चिडला होता. या गोष्टीचे अनिता हिला वाईट वाटले म्हणून तिने विष प्राशन करत असल्याचा एक व्हिडिओ बनवला. तसेच रेकॉर्ड केलेला व्हिडिओ नवऱ्याला त्याचा स्मार्टफोनवर पाठवला.(पत्नीला लागले होते Tik-Tok चे वेड, पतीने रागाच्या भरात केला खून; सोशल मीडियामुळे दोन मुले असलेल्या संसाराची वाताहत)
या प्रकारामुळे नवऱ्याला धक्का बसला आहे. परंतु टिकटॉकटा वापर सध्या प्रचंड प्रमाणात वाढला असून त्याच्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी एका टिकटॉकवरील प्रसिद्ध तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती.