तामिळनाडू: मुलाच्या प्रेयसीवर बलात्कार, गळ्यात मंगळूत्रही बांधले, 42 वर्षीय बापाला अटक; राज्यातील नागपट्टीनम जिल्ह्यातील घटना
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील नागपट्टीनम (Nagapattinam) जिल्ह्यात एका 42 वर्षीय व्यवसायिकाला पोलिसांनी (Tamil Nadu Police) अटक केली आहे. एका 20 वर्षीय महिलेवर बाल्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. धक्कादायक म्हणजे पीडित महिला ही आरोपीच्या मुलाची प्रेयसी आहे. आरोपीने पीडितेवर बलात्कार केल्यानंतर जबरस्तीने तिच्या गळ्यात मंगळूत्र (Mangalsutra) बांधण्याचाही प्रयत्न केला. ही घटना वेदारनयम इथे घडली. या प्रकरणात पोलिसांनी एका जोडप्यालाही अटक केली आहे. या जोडप्यावर आरोपीस गुन्हा करण्यास मदत केल्याचा आणि त्यासाठी घर उपलब्ध करुन दिल्याचा आरोप आहे.

पोलिसांना आरोपीची ओळख पटली असून, त्याचे नाव नित्यानंदम असे असल्याचे समजते. आरोपी हा वेदारनयम गावानजिक असलेल्या सेम्बोडाई (Sembodai) परिसरातील नागरिक आहे. याच परिसरात तो एक कपड्यांचे दुकान चालवतो. आरोपीला एन मुकेश कन्नान नावाचा एक 20 वर्षांचा मुलगा आहे. तो आयआयटीत शिकत असताना एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जमले. ही तरुणीने चेन्नई येथील एका खेळांचे साहित्य विकणाऱ्या एका आऊटलेटमध्ये काम करते.

नित्यानंदम याला आपल्या मुलाच्या आणि त्या मुलीच्या (20 वर्षीय महिला) प्रेमसंबंधांबाबत समजले. प्रेमसंबंधांबाबत समजताच चिडलेल्या नित्यानंदम याने आपला मुलगा आणि त्याची प्रेयसी यांना एकमेकांपासून वेगळे करण्याचा कट रचला. त्याने त्या मुलीला संपर्क केला आणि आपणाला 'तुझ्या आणि माझ्या मुलाच्या लग्नाबाबत तुझ्याशी बोलायचे आहे' असे सांगून सेम्बोडाई येथे बोलवून घेतले. (हेही वाचा, जालना: प्रेमी युगुलाला बेदम मारहाण, शिवीगाळ आणि तरुणीचा विनयभंग करून गावगुंड फरार; व्हायरल व्हिडीओमुळे हादरला महाराष्ट्र (Watch Video))

नित्यानंदम याच्यावर विश्वास ठेऊन ती महिला सेम्बोडाई येथे आली. ती सेम्बोडाई येथे पोहोचल्यावर नित्यानंदम याने त्या महिलेकडील फोन हिसकाऊन घेतला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिच्या गळ्यात जबरदस्तीने मंगळसूत्र अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो लैंगिक अत्याचार पीडित महिलेला घेऊन आपल्या मित्र सकथिवेल याच्या अवुरिकाडू येथील घरी गेला. तेथे त्याने तिली दोन दिवस कैद करुन ठेवले.

दरम्यान, आरोपीचा मुलगा एन मुकेश कन्नान याला घटनेबाबत माहिती कळली. त्यानंतर तो तातडीने अवुरिकाडू येथे गेला आणि त्याने पीडितेची नित्यानंदम याच्या कैदेतून सूटका काली. कन्नान हा पीडितेला घेऊन पोलीस स्थानकात गेला आणि दोघांनी मिळून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला.