Sushant Singh Rajput याचे 5 नातेवाईक रस्तेअपघातात ठार
Road Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

बिहारमधील Bihar) लखीसराय जिल्ह्यात (Lakhisarai District) मंगळवारी (16 नोव्हेंबर) भीषण अपघात घडला. या अपघातात वाहन चालकासह सात जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी पाच जण हे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचे जवळचे नातेवाईक आहेत. प्राप्त माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये लालजीत सिंह यांचा समावेश आहे. लालजीत हे हे हरियाणामध्ये एडीजीपी पदावर तैनात होते. तसेच, ते सुशांत सिंह याच्या बहिणीचे पती होत. या अपघातात लालजीत यांच्यासह त्यांची दोन मुले, दोन मुली आणि बहिणीचाही मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या वाल्मिकी सिंह यांच्यावर पाटना येथील रुग्णालयात उपचारासाठी जात असताना मृत्यू झाला.

हलसी येथील पिपरा गावातील शेखुपुरा-सिकंदरा मार्गावर मंगळवारी सकाळी 6.30 वाजता हा अपघात घडला. यात सहा लोक जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले. ट्रक आणि टाटा सुमो यांची धडक झाल्याने हा अपघात घडला. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी लखीसराय येथील सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती पाहता त्यांना पाटना येथे तातडीने उपचारासाठी नेण्याचे सांगण्यात आले. पाटना येथे उपचारासाठी जात असतानाच वाल्मिकी सिंह यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. (हेही वाचा, Rhea Chakraborty ने Sushant Singh Rajput याच्या निधनाच्या 1 वर्षानंतर शेअर केला Happy फोटो)

अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी जमुई जिल्ह्यातील खैरा येथील सकदाहा भंडारा येथून हे सर्व लोक पटनाकडे रवाना होत होते. हे सर्वजन लालजीत सिंह यांच्या पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी पाटना येथे गेले होते. लालजीत सिंह आपल्या संपूर्ण परिवारासह पाटना येथे हात होते. पत्नीच्या मृत्यूनंतर तेराव्याच्या कार्यक्रमासाठी ते गावी जात होते. कुटुंबातील 15 लोक दोन वाहनांतून निघाले होते. यापैकी एका टाटा सुमोला अपघात घडला. सांगितले जात आहे की, सिंकदरा-शेखपुर मुख्य महामार्गावर पिपरा गावाजवळ एलपीजी सिलेंडर भरलेल्या ट्रकला टाटा सुमोची समोरासमोर धडक झाली. ट्रक पटनाच्या दिशेने जात होता. तर टाटा सुमोतील लोक जमुई खैरा येथे जात होते.