सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासाठी संसदेत सादर होणार ठराव, केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय
Supreme Court | (File Photo)

नवी दिल्ली 31 जुलै: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Cabinet Ministers) आजच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची (Supreme Court Judges) संख्या वाढवण्याच्या मागणी संदर्भात निर्णय घेण्यात आला. यानुसार पुढील काहीच दिवसात यासंबंधित एक रीतसर विधयेक संसदेत सादर करण्यात येईल. हा ठराव मंजूर झाल्यास येत्या काळात सुप्रीम कोर्टातील सरन्यायाधीश वगळत अन्य न्यायाधीशांची संख्या 30 वरून 33 इतकी करण्यात येणार आहे.

तब्बल तीन कोटी खटले प्रलंबित : सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा बडगा; न्यायाधीशांच्या सुट्ट्या रद्द !

ANI ट्विट

अलीकडेच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पंतप्रधान मोदी यांना याबाबत मागणी करणारे पत्र लिहिले होते. ज्यामध्ये सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांच्या अपुऱ्या संख्येमुळे तब्बल 58 हजारहून अधिक खटले अडकून आहेत, यावर तोडगा म्हणून कोर्टाची मानवी ताकद वाढवण्याची तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली होती. याकरिता न्यायाधीशांची संख्या तसेच सध्या कार्यरत असलेल्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय वाढवण्यात यावे तसेच यासाठी आवश्यक घटनादुरुस्ती करण्यात यावी अशी सूचना गोगोईंनी मोदींना केली होती.

दरम्यान ,याबाबत आजच्या बैठकीत केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी 2016 मध्ये एनडीए सरकारने उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 906 वरुन 1079 केली होती, अशी माहिती दिली.