सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र आता मराठीतही उपलब्ध, प्रादेशिक भाषांच्या संवर्धनासाठी मोठे पाऊल
The Supreme Court of India | File Image | (Photo Credits: PTI)

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टातील (Supreme Court)  खटल्यांचे निकालपत्र आता इंग्रजी , हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये (Regional Language) उपलब्ध होणार आहेत. यानुसार यापुढे सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर इंग्रजी भाषेतील निकालपत्र आता मराठी, हिंदीसह कन्नड, आसामी, उडिया, तुलुगू भाषेतही वेबसाइटवर अपलोड करण्यात येणार आहे. या महिना अखेरीस हिंदी आणि मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल वेबसाइटवर अपलोड होतील.

प्राप्त माहितीनुसार,  बऱ्याच वर्षांपासून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल हिंदीमध्ये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली जात होती. सूत्रांच्या माहितीनुसार, हिंदीसह प्रादेशिक भाषांमध्ये निकालपत्रे उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सुरुवातीला 500 पाने आणि विस्तृत निकालपत्रे संक्षित स्वरुपात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आनंदवार्ता! मराठी भाषा शब्दसंपत्ती दीड हजारांनी वाढली

यासंदर्भात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रादेशिक भाषांमधील निकालपत्र हे निकाल जाहीर झाल्याच्या एक आठवड्यांनंतर उपलब्ध होणार आहेत, वास्तविकता इंग्रजी भाषेतील निकालपत्र खटल्याच्या निकालाच्या दिवशीच वेबसाईटवर उपलोड करण्यात येते, मात्र भाषांतरात वेळ लागणार असल्याने काही काळासाठी ही प्रक्रिया एका आठवड्याने पार पडेल.या कल्पनेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील 2017 मध्ये पाठिंबा दर्शवला होता, ज्यानुसार देहसतील उच्च व प्रादेशिक न्यायलायतील निकालपत्र त्या त्या राज्याच्या प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असावेत अशी तरतूद करण्यात आली होती.