आनंदवार्ता! मराठी भाषा शब्दसंपत्ती दीड हजारांनी वाढली
Marathi Vishwakosh Available on Website | (Photo credit: archived, edited, representative image)

Important Information About Marathi Language:  बंद पडणाऱ्या मराठी शाळा, महानगरांमधून दिवसेंदिवस घटणारा मराठी टक्का आणि इंटरनेट, कॉर्पोरेट कल्चर आदींमधून लादले जाणारे इंग्रजी भाषेचे ओझे. आदी कारणांमुळे मराठी भाषा (Marathi Language) भविष्यात कोणते दिवस पाहणार अशी चिंता करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. मराठी विश्वकोश (Marathi Vishwakosh)  निर्मिती मंडळाने पूर्वी प्रकाशित केलेल्या २० खंडांतील नोंदींच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. महत्त्वाचे असे की, नव्या शब्दकोशात तब्बल दीड हजार नव्या शब्दांची भर घालण्यात आल्याची माहिती आहे. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

विश्वकोश संकेतस्थळावर उपलब्ध

दरम्यान, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने एक धोरणात्मक निर्णयही घेतला आहे. हा धोरणात्मक निर्णय असा की, महामंडळ विश्वकोश मुद्रित माध्यमात प्रसिद्ध करणार नाही. या पुढे प्रसिद्ध होणारे विश्वकोश आणि त्यातील नव्या नोंदी तसेच, कुमार विश्वकोशाचे तीन खंड वाटत आणि अभ्यासकांसाठी www.marathivishwakosh.org या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहेत.

४७ विषयनिहाय ज्ञानमंडळांची स्थापना

दरम्यान, जुन्या विश्वकोशातील नोंदी अद्यायावत करण्याचे काम निरंतर सुरुच राहणार आहे. राज्यातील विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून हे काम गेली तीन वर्षे सुरु आहे. त्यासाठी सुमारे ४७ विषयनिहाय ज्ञानमंडळं स्थापण्यात आली आहेत. मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद अशा संस्थांचा प्रामुख्याने या मंडळांमध्ये समावेश आहे. (हेही वाचा, Marathi Bhasha Din 2019: मराठी आहात? मग तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात!)

ज्ञानमंडळांच्या कार्यकालाला २२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ

दरम्यान, विश्वकोशातील नोंदी अद्ययावतीकरणाच्या कामातील पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने विज्ञान, अभिजात भाषा आणि साहित्य, अर्थशास्त्र, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती, वैज्ञानिक चरित्रे आणि विज्ञान संस्था, सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा, संगीत अशा विविध विषयांचा समावेश आहे. दरम्यान, ज्ञानमंडळांच्या कार्यकालाला २२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहितीही करंबेळकर यांनी दिली.