Ayodhya Land Dispute Case: मध्यस्थ समितीला 31 जुलै पर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; 2 ऑगस्टला पुढील सुनावणी
Ayodhya Land Dispute Case (Photo Credits: PTI)

अयोद्धा प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या वादातून मार्ग काढण्यासाठी 3 जणांची एक मध्यस्थ समिती आखली होती. मात्र पक्षकारांनी त्यांच्या आक्षेप घेतले होते. त्यामुळे मध्यस्थी समितीचा अहवाल अपेक्षेप्रमाणे नसल्याने आता 2 ऑगस्ट पासून वादग्रस्त राम मंदीर प्रकरणाबददल सुनावणी होणार आहे. यामध्ये आता 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ निर्णय देणार आहेत. मात्र 31 जुलै पर्यंत मध्यस्थींना देखील त्यांचा अजून एक अहवाल सादर करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मध्यस्थी समितीमध्ये एफएम कलीफुल्ला अध्यक्षांसोबतअध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचा त्रिसदस्यीय समितीत समावेश होता. 2 ऑगस्ट नंतर आता या प्रकरणामध्ये पुढील सुनावणीबाबत तारीख ठरणार आहे. तेव्हाच या नियमित सुनावणी कशी होईल याची रूपरेषा आखली जाणार आहे.

सर्वोच्च न्यालायाकडून 31 जुलै दिवशी मध्यस्थींचा अहवाल ऐकला जाणार आहे. मात्र हा रिपोर्ट गुप्त राहील असे देखील सांगण्यात आले आहे. भगवान राम सगळ्यांचेच देव, संधी मिळाल्यास आपणही वीट रचणार - फारुक अब्दुल्ला

ANI Tweet

रामाच्या जन्मभूमीवरून वाद सुरू आहेत. मागील 65 वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. अनेकदा भारतीय राजकारण आणि निवडणूकांमध्ये राम जन्म भूमी प्रकरणाचा मुद्दा घेऊन आश्वासनं दिली जातात. मात्र आता नियमित सुनावणीला सुरूवात झाल्याने या प्रकरणाचा वेग वाढणार आहे.