भगवान राम सगळ्यांचेच देव, संधी मिळाल्यास आपणही वीट रचणार - फारुक अब्दुल्ला
फारुक अब्दुल्ला (फोटो सौजन्य- ANI)

Ayodhya case: सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शुक्रवारी अयोध्या राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) प्रकरणाची सुनावणी 10 जानेवारीवर ढकलली आहे. त्यामुळे नवीन खंडपीठ गठन होणार असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी राम मंदिरा प्रकरणी आपले मत मांडले आहे.

फारुक अब्दुल्ला यांनी राम मंदिर प्रकरणी एएनआयला दिलेल्या माहितनुसार, 'हे प्रकरण न्यायालयात मांडण्याऐवजी न्यायालयाबाहेर सोडवले पाहिजे' तसेच भगवान राम हे फक्त हिंदू धर्मियांसाठीच सिमीत नसून सगळ्यांचेच आहेत. त्यामुळे श्री रामाबद्दल शत्रुत्व निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. तर हा वाद सामंज्यस्याने सोडवून राम मंदिराचा पाया रचला पाहिजे. असे झाल्यास आपण स्वत: राम मंदिरासाठी वीट रचण्यास मदत करु असे फारुक यांनी म्हटले आहे. (हेही वाचा- अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी 10 जानेवारी दिवशी, नव्या खंडपीठाची होणार निर्मिती)

राम मंदिर प्रकरणी भाजपवर टीका करण्यात आली आहे. तसेच भाजप या प्रकरणी कानाडोळा करत असून फक्त सत्तेसाठी राजकरण केल जात असल्याचे ही टीका फारुक अब्दुल्ला यांनी केली आहे.