Sudden Death in Madhya Pradesh: नुकतेच तागाच्या झाडावर चढलेल्या एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊन आकस्मिक मृत्यूची घटना समोर आली होती. आता मध्य प्रदेशातील इंदूर येथेही अशीच आकस्मिक मृत्यूची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका 18 वर्षीय विद्यार्थ्याचा कोचिंग क्लासदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना बुधवारी घडली. माधव असे या मुलाचे नाव असून, तो शहरातील भंवरकुआन भागातील रहिवासी होता आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (MPPSC) प्रवेश परीक्षेसाठी प्रशिक्षण घेत होता. वर्गात असतानाच त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ही घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. माधवच्या छातीमध्ये दुखू लागल्यावर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (हेही वाचा: Heart Attack on Palm Tree Video: व्यक्तीला ताडाच्या झाडावर आला हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू; Bhuvanagiri येथील दुःखद घटना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)