Heart Attack on Palm Tree Video: सध्या हृदयविकाराचा झटक्याची अनेक प्रकरणे वरचेवर समोर येत आहेत. नुकतेच तेलंगणाच्या भुवनगिरी येथे अशीच एक दुःखद घटना घडली आहे. या ठिकाणी एका व्यक्तीला नीरा (पाम झाडापासून काढलेले पेय) आणण्यासाठी पामच्या म्हणजेच ताडाच्या झाडावर चढलेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आहे आणि त्यात त्याने आपला जीव गमावला. या अकस्मात मृत्यूची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, मृतदेह झाडावरून खाली आणला. घटनेची नेमकी परिस्थिती अद्याप तपासात आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: American Bully Dog Attack On Minor: अमेरिकन बुली कुत्र्याचा हल्ला, 7 वर्षांच्या मुलीसह 15 जण जखमी)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)