पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वादग्रस्त बीबीसी डॉक्युमेंटरी प्रदर्शित करण्याच्या वादातून दिल्लीच्या प्रतिष्ठित जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांसह डाव्या विचारसरणीच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापिठातून देखील निलंबित करण्यात आलं आहे. तरी दिल्ली पोलिसांच्या या कारवाई नंतर विद्यापिठ परिसरात आणि विद्यार्थ्यांमध्ये वातावरण चांगलचं तापलं आहे. दिल्ली पोलिसांकडून निळ्या रंगाच्या दंगल गियरमधील पोलिस आणि अश्रुधुराच्या तोफ जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या गेटवर तैनात करण्यात आल्या आहेत. तर विद्यापिठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम करण्यावर बंदी घालण्यात आली होती. तरही काही भारतीय कम्युनिस्ट पार्टी विद्यार्थी संघटना, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने नरेंद्र मोदींबाबतच्या बीबीसी डॉक्यूमेंट्रीच्या स्क्रीनिंगचा कार्यक्रम आयोजित केला होता.
2002 च्या दंगली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळावर आधारित या बीबीसी डॉक्यूमेंट्रीची सध्या देशभरात मोठी चर्चा रंगली आहे. तरी या डॉक्यूमेंट्रीत द्वेश पसरवण्याची भावना असल्याचं सांगत केंद्रीय मंत्रालयाकडून बीबीसीची ही डॉक्यूमेंट्री सोशल मीडियावरुन बॅन करण्यात आली आहे. विरोधकांनी या निर्णयाची निंदनीय सेन्सॉरशिप असल्याची टीका मोदी सरकारवर केली आहे. (हे ही वाचा:- Students Detained, Riot Police At Delhi's Jamia Over BBC Film Screening)
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देखील काल संध्याकाळी काही अशाच प्रकारचे स्क्रीनिंग विद्यार्थ्यांनी आयोजित केली होती. तर विद्यापिठाकडून थेट विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयातील इंटरनेट आणि वीज पुरवठा बंद करण्यात आला. फोन स्क्रीनवर किंवा लॅपटॉपवर डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी शेकडो लोकांचा जमाव बाहेर अंधारात एकत्र जमला होता आणि या डॉक्यूमेंट्री स्क्रीनिंग नंतर विद्यार्थ्यांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. जेएनयू अधिकाऱ्यांनी डॉक्युमेंटरी दाखविल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. या प्रकारच्या स्क्रीनिंगसह आंदोलनामुळे कॅम्पसमधील शांतता बिघडू शकते असं मह विद्यापीठ प्रशासनाचं होतं. तरी सरकारविरोधी कुठल्याही बाबतीत जामिया विद्यापीठ आणि जेएनयू विद्यापिठातील विद्यार्थी आपलं उत्सफूर्त मत मांडताना दिसतात.