Vande Bharat Express (Photo Credits: Twitter@AidealRyder/PTI)

वंदे भारत एक्सप्रेसवर (Vande Bharat Express) दगड भिरकवल्याने खिडकीच्या काचा तुटल्या आहेत. भारतातील सर्वात वेगवान ट्रेनच्या बाबतीत 2 महिन्यातील ही तिसरी घटना आहे. उत्तर रेल्वे प्रवक्ता दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन टुंडला (Tundla) स्टेशन ओलांडत असताना ही घटना घडली. यापूर्वी 2 फेब्रुवारीला काही अज्ञान इसमांनी वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी फेरी (Trial Run) सुरु असताना दगड भिरकावला होता. ही घटना शकूरबस्ती स्टेशनवरुन निघाल्यानंतर घडली होती.

तर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चाचणी फेरी सुरु असताना वंदे भारत एक्सप्रेसवर दगड फेकण्यात आला होता. त्यामुळे देखील खिडकीच्या काचा तुटल्या होत्या. 17 फेब्रुवारी पासून वंदे भारत एक्स्प्रेस अधिकृतपणे धावू लागली असून 15 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवत ट्रेनचे उद्घाटन केले. 'वंदे भारत' एक्स्प्रेसची बुकींग सुरु; IRCTC वरुन मिळवा कन्फर्म तिकीट

वंदे भारत एक्स्प्रेसच्या पुढील 10 दिवसांच्या तिकीटांची विक्री झाली आहे. ही ट्रेन आठवड्यातून पाच दिवस धावेल. सोमवार आणि गुरुवारी ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध नसेल.