वडिलांनी 4 वर्षाच्या मुलीच्या छातीवर मारला फटका, हृदय फाटून मृत्यू; दिल्ली येथील घटना
Crime | (Photo Credits: PixaBay)

वडीलांच्या रागाचे कारण ठरलेली सस्ता ओलांडतानाची चूक एका 4 वर्षे वयाच्या चिमूकलीच्या जीवावर बेतली आहे. राजधानी दिल्ली (Delhi) येथील सुल्तानपुरी (Sultanpuri) परीसरात ही घटना घडली. प्राप्त महितीनुसार ही मुलगी आपल्या वडीलांसोबत रस्ता ओलांडत होती. मात्र, रस्ता ओलांडताना चुक झाल्याने वडीलांनी मुलीच्या छातीवर जोराचा फटका मारला. हा फटका इतका जबरदस्त होता की, या घटनेत मुलीचे हृदय फाटले आणि तिचा मृत्यू झाला. रुखसार उर्फ नेहा असे या चिमुकलीचे नाव असल्याचे समजते. तर, दानिश अली (वय 32 वर्षे) असे आरोपी वडीलांचे नाव आहे. रुखसार ही त्याची सावत्र मुलगी (Step Daughter) होती.

घडना घडल्यानंतर आरोपीने गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला. शवविच्छेदन अहवालात मुलीचे हृदय फाटल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बी-ब्लॉक, सुल्तानपुरी येथे पत्नी रुखसाना आणि सावत्र मुलगी नेहा उर्फ रुखसार हिच्यासोबत राहात होता. रुखसाना हिच्या पहिल्या पतीचा 2017 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर तीने दुसरा विवाह केला. दुसरा पती तिला प्रचंड मारहाण करत असे. त्यामुळे तिने त्याला तलाक दिला होता.

दरम्यान, रुखसाना हिच्या आईने तिचे तिसरा विवाह लाऊन दिला. तिसऱ्या पती (आरोपी) सोबत ती बी-ब्लॉक, सुल्तानपुरी येथे सावत्र मुलीला घेऊन राहात होती. दानिश नांगलोई परिसरात एका कपड्याच्या दुकानात नोकरी करत होता. रुखसाना हिचा आरोप आहे की, दानिश याला पत्नीची मुलगी आवडत नव्हती. त्यामुळे तो तिला सोडण्यासाठी पत्नी रुखसाना हिच्यावर दबाव टाकत होता. या विषयावरुन दोघांमध्ये सातत्याने वाद होत असत.

घटना घडली त्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दुपारी दानिश रुखसार हिला शिकवणीला घेऊन जात होता. दरम्यान, रस्ता पार करताना त्याने तिला मारहाण केली. यात त्याने एक ठोसा तिच्या छातीवरही मारला. घाव वर्मी लागल्याने रुखसार ही जागीच बेशुद्ध पडली. (हेही वाचा, धक्कादायक! पत्नीने स्वंयपाक घरात पूरला पतीचा मृतदेह आणि महिनाभर केलं 'हे' काम)

दरम्यान, बेशुद्ध अवस्थेत असलेल्या रुखसार हिला घेऊन दानिश घरी गेला. त्याने पत्नीला सांगितले की, रस्त्यात गाडीने धडक दिल्यामुळे रुखसार बेशुद्ध झाली आहे. दरम्यान दानिश आणि रुखसाना हिने आपली मुलगी रुखसार हिला संजय गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. मुलीच्या मृत्यूबाबत संशय आल्याने रुखसाना हिने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी दानिश याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.