Image used for Representational purpose only | File Image

भारतामध्ये कोवॅक्सिन, कोविशिल्ड यांच्यासोबतीने आता स्फुटनिक वी ही तिसरी लसदेखील उपलब्ध झाली आहे. आज (14 मे) अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सध्या स्फुटनिक वी (Sputnik V) लसीच्या 2 खेपी भारतामध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांना भारताच्या हिमाचल प्रदेशातील Kasauli येथील Central Drugs Laboratory कडून परवानगी मिळाल्यानंतर आजपासून ही लस नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. सध्या मर्यादित साठा असल्याने ही लस मोजक्या ठिकाणी उपलब्ध आहे. हैदराबाद मध्ये डॉ. रेड्डीज लॅबचे Global Head of Custom Pharma Services,Deepak Sapra यांना ही पहिली लस देण्यात आली आहे.

भारतातील इतर लसींप्रमाणेच स्फुटनिक वी चे देखील 2 डोस द्यावे लागणार आहेत. ही देशात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली पहिली परदेशी लस आहे. या लसीची प्रभाव देखील 90% जवळ आहे. दरम्यान भारतात आता या लसीचे उत्पादन सुरू केले जाणार आहे. आज डॉ. रेड्डीज लॅब कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्फुटनिक वी लसीची किंमत 948 रूपये आणि 5% जीएसटी म्हणजे 995 रूपये प्रतिडोस आकारण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये जसजसे या लसीचे उत्पादन वाढेल तसे या लसीच्या किंमतीमध्ये देखील घसरण होणार आहे. Sputnik V Vaccine Update: भारतामध्ये HETERO सोबत RDIF करणार कोविड 19 वरील लसीचं उत्पादन.

हैदराबाद मध्ये देण्यात आलेला आज पहिला डोस

भारतामध्ये सध्या केंद्र सरकारकडून 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे तर राज्य सरकार 18-44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करत आहे. या दोन्ही मोफत आहेत. सध्याच्या घडीला भारतामध्ये 18 कोटीपेक्षा अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी आता लसीकरण वेगवान करण्याचे सरकार प्रयत्न करत आहे.