Parliamentary (File Image)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. यात पाच बैठका होतील, अशी माहिती आहे. 17 व्या लोकसभेचं 13 वे अधिवेशन आणि राज्यसभेचे 261 वे अधिवेशन आहे. या विशेष अधिवेशनात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, संसदेचं विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये 5 बैठका होणार आहेत. (हेही वाचा - INDIA bloc in Mumbai for Third Meet: मुंबईत कॉंग्रेस कडून Sonia Gandhi, Rahul Gandhi यांच्या स्वागताला ढोल ताशा (Watch Video))

पाहा पोस्ट -

20 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत संसदेचे पावसाळी अधिवेशन पार पडले. त्यात मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला होता. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावं, यावर विरोधक आग्रही होते. तर सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या मुद्यावर उत्तर देतील यावर सरकार ठाम होते. संसदेत या मुद्द्यावर सरकार चर्चा करण्यास तयार आहे, असे सांगण्यात आले. मात्र, यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती.