Sovereign Gold Bond (SGB) Scheme च्या चौथ्या टप्प्याला आज (6 जुलै) पासून सुरूवात झाली आहे. दरम्यान भारत सरकारच्या वतीन रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) आजपासून पुढील 5 दिवस सोनं खरेदीचं ही संधी भारतीयांसाठी खुली करत आहे. म्हणजेच 10 जुलै पर्यंत तुम्हांला सोनं खरेदीची संधी उपलब्ध आहे. दरम्यान आरबीआयने या चौथ्या टप्प्यासाठी 4,852 रूपये प्रति ग्राम इतका सोन्याचा दर दिला आहे.
दरम्यान ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्किममध्ये खरेदी केल्यास त्यांना प्रति ग्राम 50 रूपयांची सूट दिली जाणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना 4,802 रूपये प्रति ग्राम इतका दर मिळू शकतो अशी माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे. तसेच गुंतवणूकदारांना किमान 1 ग्राम ते 4 किलो पर्यंत सोनं खरेदी करण्याची मुभा आहे. तर ट्र्स्टसाठी सोनं खरेदीची कमाल मर्यादा 20 किलो पर्यंत आहे. दरम्यान गोल्ड बॉन्ड्सची कालमर्यादा ही 8 वर्षांसाठी आहे. पाच वर्षांनंतर त्याचा एक्झिट प्लॅन देखील आहे.
गुंतवणूकदारांना गोल्ड बॉन्ड्स हे बॅंकेच्या माध्यमातूनदेखील विकण्याची मुभा आहे. यासोबत SHCIL, पोस्ट ऑफिस, स्टॉक एक्सचेंज यांच्यामाध्यामातून देखील ते विकले जाऊ शकतात.
एप्रिल 2020 पासून सुरू झालेली ही स्कीम गुंतवणूकदारांसाठी सप्टेंबर 2020 पर्यंत टप्प्याटप्प्यामध्ये उपलब्ध केली जाणार आहे.
भारतीयांमध्ये सोनं खरेदी बद्दल विशेष आकर्षण असतं. दरम्यान महत्त्वाच्या मुहूर्तावर सोनं खरेदी केलं जातं. परंतू भारतीयांची ही सोनं खरेदी आता ई स्वरूपात करण्यासाठी आणि बचतीचा नवा पर्याय खुला करण्यासाठी 2015 साली नोव्हेंबर महिन्यात सरकारने ही स्कीम लॉन्च केली आहे.
सध्या जगभरात कोरोना संकट काळामध्ये अर्थव्यवस्था विस्कळीत झाल्या आहे. अनेक कंपन्या दिवाळखोरीत जाण्याच्या, ठप्प पडण्याची शक्यता आहे. अशावेळेस अनेकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सुरक्षित पर्याय निवडला आहे.