Rajiv Gandhi Death Anniversary 2019: गांधी कुटुंबीयांसह डॉ. मनमोहन सिंग, प्रणब मुखर्जी यांनी अर्पण केली राजीव गांधी यांच्या स्मृतिस्थळावर श्रद्धांजली
Rajiv Gandhi Death Anniversary (Photo Credits: Twitter)

Rajiv Gandhi's 28th Death Anniversary:  भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची आज 28 वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने गांधी कुटुंबियांसह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज राहुल गांधी (Rahul Gandhi), सोनिया गांधी (Sonia Gandhi), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra), रॉबर्ट वड्रा यांनी 'वीर भूमी' (Veer Bhumi) या स्मृतिस्थळावर जाऊन राजीव गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. Rajiv Gandhi Death Anniversary 2019: राजीव गांधी यांच्याविषयी माहिती नसलेल्या 5 इंटरेस्टिंग गोष्टी

गांधी कुटुंबीयांनी अर्पण केली श्रद्धांजली

1991 साली राजीव गांधी यांची लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान एका भर सभेमध्ये मानवी बॉम्बहल्ल्यामध्ये हत्या करण्यात आली होती. राजीव गांधी यांची पुण्यतिथी भारतामध्ये Anti Terrorism Day म्हणून साजरा केला जातो.