प्रसिद्ध व्यक्तींच्या मोठपणाला जोडून येणारी बाब म्हणजे टीका, या टीका जोवर नैतिकता जपून केल्या जातात तोवर त्यांच्यातून सुधारण्याची संधी मिळत असते. पण अलीकडे सोशल मीडियावरून टीकेच्या नावाखाली पसरलेलं ट्रोल्सचं वादळ मात्र केवळ अपमान करण्याचं साधन बनलंय.केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांची कन्या देखील अलीकडे याच ट्रोलर्सची शिकार बनली. जोईश इराणी (Zoish Irani) हिने काही दिवसांपूर्वी आपली आई स्मृती यांच्यासोबत पोस्ट केलेल्या एका फोटोवरून ट्रोलर्सनी तिला निशाणा केले होते. यानंतर स्मृती यांनीच तो फोटो डिलीट करून आपल्या अकाउंट वरून तिचा फोटो शेअर केला आणि या फोटोखाली एक सणसणीत उत्तर देऊन ट्रोलर्सना (Trollers) खडेबोल सुनावले.
स्मृती यांची मुलगी जोईश इराणी हिच्या फोटो पाहिल्यावर 'ए झा' नामक व्यक्तीने तिला शाळेमध्ये चिडवायला सुरवात केली. तसंच इतर मुलांनाही त्या फोटोवर जाऊन कमेंट करायला सांगितलं . फोटोमध्ये तिची हेअरस्टाइल अतिशय वाईट असल्याचं सांगून तो तिला ट्रोल करू लागला. या त्रासाला वैतागून जोईश हिने . घरी आल्यावर तिने स्मृती इराणींना तो फोटो डिलीट करण्याची विनंती केली. त्यानंतर स्मृती इराणींनी तो फोटो डिलीट केला. मात्र अशा प्रकारे लोकांना घाबरण्याचे कारण नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या अकाउंट वरून आपल्या मुलीचा एक फोटो शेअर केला. RSS ची खाकी पॅन्ट घालून आलीस का? प्रियांका चोप्रा हिची पुन्हा एकदा सोशल मीडियात ड्रेसवरुन खिल्ली
या फोटो खाली त्यांनी जोईश हिच्या विविध क्षेत्रातील कामगिरी बद्दल सांगत "तुम्ही कितीही त्रास द्या, ती सक्षमपणे सामना करेल, ती जोईश इराणी आहे आणि मला तिची आई असल्याचा सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी जोईशची पाठराखण केली. त्याचप्रमाणे तिला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना स्मृती यांनी ताकीद दिली आहे. सोशल मीडियात ट्रोल करणार्यांवर कठोर कारवाई करा; केतकी चितळे ची देवेंद्र फडणवीस यांना भेटून विनंती
स्मृती इराणी इंस्टाग्राम पोस्ट
स्मृती इराणी यांच्या इंस्टाग्राम पोस्टला त्यांच्या चाहत्यांनी पाठिंबा दर्शवला. तसेच आपल्या मुलीसाठी खंबीर उभ्या राहणाऱ्या स्मृती यांचे कौतुक सुद्धा केले. अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलर्स नैतिकतेच्या सर्व पायऱ्या ओलांडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना पाहायला मिळतात, अशा मंडळींना स्मृती यांच्या बोलण्याचा कितपत फरक पडतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.