कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोलर्सकडून अपशब्दांचा वापर केल्याने होणार्या त्रासला काही जण दुर्लक्षित करतात तर काही जण सडेतोड जबाब देतात. काही दिवसांपूर्वी केतकी चितळेला (Ketaki Chitale) होणार्या त्रासाचाही तिने सोशल मीडियावर हिशोब मांडला होता. शिव्या, अपशब्द देऊन मराठी भाषेचा उद्धार करणार्या आणि हिंदी भाषेचा वापर केल्याने ट्रोल झालेल्या केतकीने त्याच भाषेत ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. त्यानंतर अशा ट्रोलर्सना शिक्षा मिळावी याकरिता तिनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटून संबंधितांवर आवश्यक कारवाई करण्याची विनंती केली आहे.
केतकी चितळे सोबत अभिनेता दिगंबर नाईक, सुशांत शेलार आणि शिवसेना नेत्या नीलम गोर्हेदेखील उपस्थित होत्या.
केतकी चितळे, सुशांत शेलार नीलम गोऱ्हे ही मंडळी भेटले मुख्यमंत्र्यांना. केटकीला ट्रोल करणाऱ्या ट्रोलकऱ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी. pic.twitter.com/Ap6IeN5lfO
— DHANTEDHAN (@DhanABP) June 18, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना अटक करण्याची सूचना गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकाऱ्यांना केली असल्याची माहिती एका वाहिनीने दिली आहे. आयटी अॅक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केतकीने दिलेल्या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.