Smriti Irani On George Soros: अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वक्तव्य, स्मृती इराणी यांच्याकडून भारतीयांना अवाहन
Smriti Irani On George Soros | (Photo Credits: Archived, edited)

हिंडेनबर्ग रिपोर्ट (Hindenburg Research) आणि गौतम अदाणी या मुद्द्यावरुन अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस (George Soros) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल टिप्पणी केली. या टिप्पणीत त्यांनी म्हटले की, भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या शेअर बाजारातील अलीकडच्या अडचणींमुळे भारतात लोकशाही पुनरुज्जीवन होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. दरम्यान, जॉर्ज सोरोस यांच्या टिप्पणीनंतर भाजपकडून लगेचच प्रतिक्रिया आली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी लगेचच पुढे येत म्हटले आहे की, भारताच्या लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्या परकीय शक्तींविरोधात भारतीय नागरिकांनी एकत्र यावे. या शक्तींचा हल्ला सर्वांनी एकत्र येऊन परतवून लावायला हवा, असेही स्मृती इरणी यांनी म्हटले.

स्मृती इराणी यांनी आक्रमक होत पुढे म्हटले की, मी प्रत्येक भारतीयाला अवाहन करते की त्यांनी जॉर्ज सोरोस यांना सडेतोड प्रत्युत्तर द्यावे. त्यांचे वक्तव्य म्हणजे भारतीय लोकशाही प्रक्रियेतील अडथळा आहे. भारतीयांनी आशा अडथळ्यांचा या पूर्वी अनेकदा पराभव केला आहे. आता ते पुन्हा प्रयत्न करत आहेत. पण, त्यात त्यांना यश येणार नाही, असेही इराणी यांनी म्हणले. (हेही वाचा, Rahul Gandhi on PM Narendra Modi's speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर राहुल गांधी यांची खोचक प्रतिक्रिया, काय म्हणाले पाहा)

दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान-संबंधित अदानी घोटाळ्यामुळे भारतात लोकशाही पुनरुज्जीवन होते की नाही हे पूर्णपणे काँग्रेस, विरोधी पक्ष आणि आमच्या निवडणूक प्रक्रियेवर अवलंबून आहे. जॉर्ज सोरोसशी त्याचा काहीही संबंध नाही. आमचा नेहरूवादी वारसा हे सुनिश्चित करतो की सोरोससारखे लोक आमचे निवडणूक निकाल ठरवू शकत नाहीत.

स्मृती इरांनी यांनी जॉर्ज सोरोस यांच्यावरील हल्ला कायम ठेवत पुढे म्हटले की, तो एक 'आर्थिक युद्ध गुन्हेगार' आहे. ज्याने भारताबद्दल त्याचा दृष्ट हेतू प्रकट केला आहे. ज्या व्यक्तीने इंग्लंडच्या बँकिंगमध्ये तोडफोड केली आहे. ज्याला त्याच्याच राष्ट्राने गुन्हेगार ठरवले आहे. तोच व्यक्ती आता भारतीय लोकशाहीबद्दल मत व्यक्त करतो आहे. जॉर्ज सोरोस याने भारताबद्दल वाईट हेतू ठेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर विधान केल्याचेही इराणी म्हणाल्या.