Rahul Gandhi on PM Narendra Modi's speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर राहुल गांधी यांची खोचक प्रतिक्रिया, काय म्हणाले पाहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गौतम अदानी (Gautam Adani) यांचा बचाव करत आहेत. त्यांना पाठीशी घालत आहेत, असा थेट आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul-Gandhi) यांनी पुन्हा एकदा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत आज उत्तरादाखल भाषण केले.

Rahul Gandhi on PM Narendra Modi's speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर राहुल गांधी यांची खोचक प्रतिक्रिया, काय म्हणाले पाहा
Rahul Gandhi | (Photo Credit - Twitter/ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गौतम अदानी (Gautam Adani) यांचा बचाव करत आहेत. त्यांना पाठीशी घालत आहेत, असा थेट आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul-Gandhi) यांनी पुन्हा एकदा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत आज उत्तरादाखल भाषण केले. या भाषणानंतर राहुल गांधी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणात काँग्रेसच्या सत्ताकाळातील कथीत भ्रष्टाचारावर जोरदार टीकास्त्र सोडले. परंतू, राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले नाही. खास करुन गौतम अदानी यांच्यावरुन विचारलेल्या प्रश्नाला मोदी यांनी पूर्णपणे बगल दिली.

राहुल गांधी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, पंतप्रधानांच्या भाषणावर मी समाधानी नाही. पण त्यातून सत्य समोर आले आहे. चौकशीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. जर ते त्यांचे (गौतम अदानी) मित्र नसते तर त्यांनी चौकशीसाठी सहमती दर्शवायला हवी होती. थेट चौकशीचे आदेश द्यायला हवे होते. संरक्षण क्षेत्रातील शेल कंपन्यांची चौकशी झाली नाही. तसेच, बेनामी पैसा पैशांबद्दलही ते बोलले नाहीत. हे स्पष्ट आहे की पंतप्रधान त्यांचे (गौतम अदानी) संरक्षण करत आहेत, असे राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधानांच्या उत्तरानंतर पत्रकारांना सांगितले. (हेही वाचा, PM Narendra Modi On Adani Group Issue: अदानीच्या मुद्यावरुन राहुल गांधी यांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? घ्या जाणून)

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेतील आजच्या भाषणात राहुल गांधी यांनी हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्ट, गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी (PM Narendra Modi On Adani Group Issue) यांचे संबंध, अदानी समूहाबद्दल उपस्थित केललेले प्रश्न, अशा विविध मुद्द्यांवर पंतप्रधान भाष्य करतील असे अपेक्षीत होते. मात्र, पंतप्रधानांनी अदानींच्या मुद्यावर भाष्य करणे कटाक्षाणे टाळले. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा भर प्रामुख्याने यूपीए सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारावर होता. पंतप्रधानांनी टूजी, कोलगेट, कॅश फॉर व्होट आणि कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यांचा उल्लेख करून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएवर हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमधील संरक्षण घोटाळ्यांबद्दलही भाष्य केले आणि 2004 ते 2014 या दशकाला "हरवलेले दशक" असेही म्हटले.

व्हिडिओ

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, टीएमसीचे महुआ मोईत्रा आणि आरजेडीचे मनोज झा यांच्यासह विरोधी खासदारांनी यापूर्वी अदानी मुद्द्यावरून मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल केला होता. अदानींच्या फायद्यासाठी मोदी सरकार नियम झुगारत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. पीएम मोदींचे उद्योगपतीशी काय संबंध आहेत, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. मात्र, पंतप्रधानांनी यापैकी कोणत्याच मुद्द्यावर भाष्य केले नाही.

(The above story first appeared on LatestLY on Feb 08, 2023 08:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).