Sir John Tenniel's 200th Birthday: 'नाइट हुड' (Knighthood) या उपाधीने गौरविण्यात आलेले जगप्रसिद्ध इंग्रजी चित्रकार, ग्राफिक हास्यकार आणि राजकीय व्यंगचित्रकार सर जॉन टेनियल (Sir John Tenniel यांचा आज (28 फेब्रुवारी) जन्मदिन. त्यांचा जन्मदिन सर्च इंजिन गुगूल मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत आहे. कदाचित म्हणूनच गुगलने सर रॉन टेनियल यांचे डूडल बनवले असावे. कृष्णधवल रंगात असलेले सर 'जॉन टेनियल गूगल डूडल' (Sir John Tenniel Google Doodle) लक्षवेधी बनलं आहे.
जर आपण सर जॉन टेनियल यांचे मूळ 'Alice's Adventures in Wonderland' हे पुस्तक वाचले तर, तुम्हाला आजच्या गूगल डूडलमधी गंमत अधिक समजेल. 26 नोव्हेंबर 1865 रोजी प्रकाशित झालेले हे पुस्तक सर टेनियल यांनी सचित्र प्रकाशित केले होते. ज्याचा आधार घेत गुगलने आजचे डूडल बनवले आहे. आजच्या गूगड डूडलमध्ये एक चित्र दिसते. या चित्रात एलैसी (Alice) नामक एक मुलगी एका मांजरीसोबत बोलताना दाखवली आहे. ही मुलगी आणि मांजर यांच्यातील संवाद मोठा मजेशीर आहे. जो मूळ पुस्तकातही पाहायला मिळतो. ही मुलगी झाडावरच्या मांजरीला विचारते या पुढचा प्रवास मला कोणत्या रस्त्याने करायचा आहे. यावर ती मांजर म्हणते या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कोठे जायचे आहे त्यावर अवलंबून आहे. तर अशीही सगळी गंमत.
यात आणखीही एक गंमत अशी की कदाचित गुगलही हेच सांगते आहे की, इथे खूप गोष्टी मिळतात. पण, तुम्हाला नेमके काय शोधायचे आहे यावर तुम्हाला मिळणारा परिणाम (ओपन होणारे पेज) अवलंबून आहे. (हेही वाचा, Google Doodle : कर्णबधीरांचे पितामह Charles-Michel de l'Épée यांना गुगलची आदरांजली)
यूट्यूब व्हिडिओ
लंडन येथील बेवासेटर येथे जॉन बुपटिस्ट टेनियल यांच्या घरी 28 फेब्रुवारी 1820 या दिवशी जॉन टेनियल यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हुगेनोट वंशातील एक उत्कृष्ट तलवारबाज आणि न्यृत्यगुरु होते. टेनियल यांच्या आईचे नाव एलिजा मारिया टेनिएल असे होते. टेनियल हे एक शांत आणि आतर्मुखी स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांनी काढलेली चित्रं, ग्राफीक्स देश विदेशात प्रचंड गाजली. जगभरातील लोकांनी त्यांच्यावर प्रेम केले. वयाची 94 वर्षे पूर्ण होण्यास अवघे 3 दिवस बाकी असताना टेनियल यांचा मृत्यू झाला. तो दिवस होता 25 फेब्रुवारी 1914. टेनियल यांना 1893 मध्ये क्विन व्हिक्टोरीया यांच्याकून सार्वजनिक जीवनात चांगली सेवा दिल्याबद्धल विशेष श्रद्धांजली वाहण्यात आली.