Coronavirus Update in India: भारतात कोरोनाचा हाहाकार! 60,963 नव्या रुग्णांसह देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 23,29,639 वर
Coronavirus (Photo Credits: Twitter)

भारत केंद्र सरकार आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 60,963 कोरोनाचे रुग्ण दगावले असून 834 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे देशात कोरोना संक्रमितांची (COVID-19 Positive) एकूण संख्या 23,29,639 वर पोहोचली असून 46,091 दगावल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबतच सद्य घडीला देशात 64,948 रुग्णांवर उपचार सुरु असून 16,39,600 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ही आकडेवारी पाहता देशात कोरोनाचे स्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहेत.

देशात 11 ऑगस्ट पर्यंत 2,60,15,297 कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून काल दिवसभरात 7,33,449 रक्ताचे नमुने तपासण्यात आले असल्याची माहिती ICMR ने दिली आहे.

हेदेखील वाचा- भारताचा GDP Growth कोरोना संकटामुळे स्वातंत्र्यानंतरचा निच्चांकी स्तरावर पोहचण्याची भीती: N R Narayan Murthy

देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात असून त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली आणि गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांचा आकडा 5,35,601 इतका झाला आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्य 1,48,553 आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 18,306 जणांचाही समावेश आहे.