भारताचा GDP Growth कोरोना संकटामुळे स्वातंत्र्यानंतरचा निच्चांकी स्तरावर पोहचण्याची भीती: N R Narayan Murthy
Infosys Founder NR Narayan Murthy (Photo Credits: IANS)

भारतामध्ये कोरोना व्हायरस संकटामुळे देशाच्या स्वातंत्र्यानंतरची सगळयात मोठी घसरण जीडीपी मध्ये दिसू शकते अशी भीती इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्यामते किमान 5% ची घसरण देशाच्या जीडीपीमध्ये यंदा होऊ शकते. जगभरात अनेक देशांचे जीडीपी डबघईला गेले आहे. येत्या आर्थिक वर्षात जगामध्ये जीडीपीमध्ये 10% घट होण्याची शक्यता देखील त्यांनी बोलून दाखवली आहे.

कोरोना संकटात लॉकडाऊन वाढवणं हा अरर्थव्यवस्थेला फटका असल्याची भीती नारायण मूर्ती यांनी पहिल्यापासून बोलून दाखवली होती. त्यांच्यामते आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकायला हवं. कारण या आजारावर अद्याप औषध नाही, उपाय नाही आणि अर्थव्यवथेला रोखूनही ठेवता येऊ शकत नाही.

140 मिलियन कामगारांना आपण कोरोना व्हायरसमुळे कामापासून रोखू शकत नाही. आपल्याला न्यू नॉर्मल स्वीकारण्यातच खरं शहाणपण आहे. भारतामध्ये कोरोना व्हायरस विरूद्ध लस येण्यासाठी अजूनही 6-8 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. जरी दिवसाला 10 मिलियन लोकांना अपण तेव्हा लस देऊ शकलो तरीही संपूर्ण देशामध्ये व्हॅक्सिनेशन होण्यासाठी 140 दिवसांचा कालावधी लागणार आणि हा काळ फार मोठा आहे.

भारतामध्ये आपण अजूनही आरोग्य व्यवस्थेवर पुरेसा खर्च आणि यंत्रणा उभी करण्याचं काम केलेले नाही. आता health infrastructure उभारणं गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी स्थलांतरित मजुरांना पुन्हा काम देणं गरजेचे आहे. मजुरांच्या अभावी ठप्प पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू होणं गरजेचे आहे असेदेखील नारायण मूर्ती म्हणाले आहेत.

दरम्यान अनेक रेटिंग एजंसीकडून कोरोना संकट काळाचा भारताच्या जीडीपीवर मोठा गंभीर परिणाम होणार आहे. तो 3 ते 9% टक्के घसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. रेटिंग एजेंसी फिच रेटिंग्सच्या मते भारतीय अर्थव्यवस्था 2020-21 मध्ये 5% घसरण्याची शक्यता आहे. तर रेटिंग एजेंसी क्रिसिल च्या दाव्यानुसार, भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर चौथी मंदी येऊ शकते. दरम्यान रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया कडून देखील जीडीपी निगेटिव्ह मध्ये जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.