Farmers Protest (Photo Credits: ANI)

दिल्ली-हरियाणा बॉर्डर (Delhi-Haryana Border) वर सोनीपत जिल्ह्यातील सिंघु बॉर्डर (Singhu Border) येथे एका युवकाची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेल्या युवकाावर गुरु ग्रंथ साहिब यांच्याशी छेडछाड केल्याचा आरोप आहे. केंद्राने संमत केलेले तीन कृषी कायदे रद्द व्हावेत अशी मागणी करत असलेल्या आंदोलनस्थळी बॅरीकेटला लटकवलेल्या अवस्थेत या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह पाहताच समोर येते की, तरुणाची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्या आली आहे. प्राप्ता माहितीनुसार, मृत तरुणाची ओळख पटली असून, त्याचे नाव लखबीर सिंह असे आहे. पस्तीस  वर्षे वयाचा हा तरुण पंजाब येथील तरनतारन येथील राहणारा आहे.

लखबीर सिंह हा मजूरी करत असे. त्याला मंचाजवळून पकडून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. लखबीर सिंह हा सहा महिन्यांचा असताना हरनाम सिंह यांनी त्याला दत्तक घेतले होते. लखबीर सिंह याचे खरे वडील दर्शन सिंह हे आहेत. त्यांचा मृत्यू झाला आहे. लखबीर याची या आगोदरची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याची चर्चा आहे. (हेही वाचा, Lakhimpur Kheri Violence: येत्या 18 ऑक्टोंबरला शेतकऱ्यांकडून 6 तासांसाठी रेल रोको)

प्राथमिक अहवालानुसार, निहंगातील एक योद्धा सिख समूहावर हरियाणा येथील सोनीपत जिल्ह्यातील कुंडली परिसरात झालेल्या या क्रुर हत्येचा आरोप आहे. याबाबत एक व्हिडिओही पुढे आला आहे. ज्याची पुष्टी लेटेस्टली मराठी करत नाही. व्हिडिओत दिसते की, काही लोक तरुणाच्या (मृत) चौफेर उभे आहेत. त्याला त्याचे नाव, गाव विचारत आहेत. जखमी असलेल्या तरुणाची मदतही करताना कोणी दिसत नाही. दरम्यान, पोलीसांनी तपास सुरु केला आहे.  ही हत्या कोणी केली याबातब पोलिसांकडून अद्याप कोणतीही माहिती पुढे आली नाही.

ट्विट

ट्विट

दरम्यान, सोनीपत पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शुक्रवारी सकाळी आंदोलक शेतकऱ्यांच्या मुख्य मंचापाठिमागे हा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना आंदोलकांच्या विरोधाचा सामना करावा लागला.मात्र पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संयुक्त किसान मोर्चाने या घटनेनंतर दुपारी 12 वाजता एक बैठक बोलावली आहे.