Farmers Protest (Photo Credits-PTI)

Lakhimpur Kheri Violence:  संयुक्त किसान मोर्चा, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या विरोधात कार्यवाही करण्यात न आल्याने येत्या 18 ऑक्टोंबरला 6 तासांसाठी शेतकऱ्यांकडून रेल रोको केले जाणार आहे. एसकेएम यांचे असे म्हणणे आहे की, टेनी लखमीपुर घटनेतील आरोपी आहे. तर 3 ऑक्टोंबरला झालेल्या चार शेतकऱ्यांसह 9 जणांचा सुद्धा मृत्यू झाला. शेतकऱ्यांच्या मंत्र्यांनी आपराधाचा कट रचल्याचा आरोप लावला आहे. त्यांच्या मुलाला चार शेतकरी आणि एका पत्रकाराची हत्या केल्याने अटक केले आहे.

भारतीय किसान युनियन (बीकेयू) चे प्रवक्ते राकेत टिकैत यांनी गुरुवारी अलीगढमध्ये एका खासगी कार्यक्रमात असे म्हटले की, शेतकरी सोमवारी सकाळी 10 वाजता ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत विरोध दर्शवत सहा तासांसाठी रेल्वे रोको करणार आहे.(Ayodhya: दुर्गापूजेवेळी जोरदार गोळीबार, एका व्यक्तीचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी)

पुढे असे त्यांनी म्हटले की, प्रत्येक जिल्ह्यात आपल्या जवळच्या रेल्वे लाइनवर नाकाबंदी करणार आहे. मंत्र्यांवर अपराधाच्या कटाचा आरोप लावला आहे. मात्र त्यांना अटक करण्यासह पदावरुन हटवण्यात सुद्धा आले नाही. त्यांच्या मुलाला खुप वेळानंतर अटक केली गेली. तसेच त्याला जर पदावर ठेवले गेले तर आम्हाला न्याय मिळणार नाही असे ही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे जो पर्यंत त्यांना पदावरुन हटवत नाही तो पर्यंत आम्ही आमच्या रेल रोको कार्यक्रमासह पुढे वाटचाल करणार आहोत.

रेल रोकोची तयारी सुरू झाली आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी नाकाबंदीसाठी 36 ठिकाणे निवडली आहेत. पंजाबमधील बीकेयूचे राज्य सरचिटणीस जगमोहन सिंग म्हणाले, “आम्ही हे सुनिश्चित करू की कोणत्याही राज्यातील कोणतीही ट्रेन या ठिकाणांमधून जाणार नाही.” मथुरामध्ये शेकडो लोकांना सर्व स्थानकांवर येण्यास सांगितले आहे. मथुरेमध्ये, बीकेयूचे जिल्हाध्यक्ष राजकुमार तोमर म्हणाले, "सुमारे 600 लोकांना राया स्टेशनवर आणि सुमारे 400 लोकांना मथुरा जंक्शनवर एकत्र येण्यास सांगण्यात आले आहे."